कोपरगाव तालुका
शिक्षण तज्ज्ञ लहानुभाऊ नागरे यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था व विश्वभारती रुरल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व शिक्षण तज्ज्ञ गणपतराव विठोबा नागरे तथा लहानुभाऊ नागरे (वय-८३) यांचे आज सकाळी ७.३० वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी पार्वताबाई नागरे,मुलगा संजय नागरे,चार मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने एक शिक्षण व लष्करी तज्ञ राजकीय नेता गमावल्याची तालुक्यात भावना निर्माण झाली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्यात सहकारी साखर कारखानदारीला जोडून ग्रामीण भागात खाजगी तत्त्वावर उच्च शिक्षणाची गंगोत्री आणण्याचा निर्णय घेतला यात स्व.लहानुभाऊ नागरे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यात तंत्र शिक्षणाची गंगा प्रथम संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणली.ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उसातून प्रतिटन पंचवीस रुपयांची कपात करून या उच्च शिक्षण संस्थांची उभारणी केली होती.त्यांनी परिभ्रमण यासह तीन ते चार पुस्तके लिहिली होती.तर तालुक्यातील यशस्वी राजकीय नेत्यांवर एक पुस्तक लिहिण्याचे राहून गेले आहे.
स्व.लहानुभाऊ नागरे हे प्रथम माजी आ.स्व.के.बी.रोहमारे यांचे कट्टर समर्थक तर माजी आ.दादा पा.रोहमारे यांचे सहकारी होते.त्यानंतर ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात.त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्यात सहकारी साखर कारखानदारीला जोडून ग्रामीण भागात खाजगी तत्त्वावर उच्च तंत्र शिक्षणाची गंगोत्री आणण्याचा निर्णय घेतला यात स्व.लहानुभाऊ नागरे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यात उच्चतंत्र शिक्षणाची गंगा प्रथम संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणली.ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उसातून प्रतिटन पंचवीस रुपयांची कपात करून या उच्च शिक्षण संस्थांची उभारणी केली होती.मात्र १९९७ साली स्व.नामदेवराव परजणे यांनी १९९७ च्या पोट निवडणुकीत आ.राधाकृष्ण विखे यांना मदत करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून माजी मंत्री शंकरराव कोल्हे व त्यांच्यात ठिणगी पडली त्यातून पुढे दोन गट निर्माण झाले.त्यातून सावध होऊन माजी मंत्री कोल्हे यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला काढण्याचा जो सपाटा लावला त्याचा फटका लहानुभाऊ नागरे यांनाही सहन करावा लागला.त्यांना या संस्थेपासून सोयीस्कररित्या बाजूला सारले गेले.त्यामुळे त्यांनी नंतर माजी खा.शंकरराव काळे यांची सोबत केली.त्यांना कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष,दहा वर्ष संचालक,म्हणूनही त्यांनी संधी दिली होती.त्या आधी संजीवनीचे कारखाण्याचे ते जवळपास तेहतीस वर्ष संचालक म्हणून तर संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे जवळपास एकोणाविस वर्ष अध्यक्षपद भूषवले होते.त्यांनतर त्यांनी आपली विश्वभारती एज्युकेशन सोसायटीची व जेऊर कुंभारी सेवा संस्थेची स्थापना करून ते त्या संस्थेचे तह्यात अध्यक्ष होते.स्थापना केली सन-२०१० साली करून ती संस्था यशस्वी करून दाखवली होती.त्यांनी १९६२ साली प्राथमिक शाळेला अर्धा एकर जमीन दान देऊन त्याचे उदघाटन तत्कालीन शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई,विधान सभेचे माजी सभापती बाळासाहेब भारदे यांचे हस्ते त्याचे उदघाटन केले होते.
आज सकाळी ते पुर्ववत वेळेत उठून आपला सर्व विधी उरकत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यातच त्यांची प्राण ज्योत मालवली आहे.त्यांच्यावर आज दुपारी तीन चारी येथील वस्तीवर अंत्यसंस्कार अकरण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव संजय नागरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,कोपरगाव कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.