कोपरगाव तालुका
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत गुणवत्ता कमी नाही-आरसा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजीटल शिक्षण ही काळाची गरज बनली असून याबाबतीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कमी नाही असे प्रतिपादन प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच हंडेवाडी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षणाचे महत्व अधोरेखित झाले आहे.ऑनलाईनच्या माध्यमातून जागतिक स्तरावर सर्व क्षेत्रात सर्वच प्रकारचे व्यवहार होत असतांना ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नये यासाठी डिजिटल क्लासरूम मोलाची भूमिका बजावणार आहे-आ.काळे
कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी येथे जिल्हा कार्ययोजने अंतर्गत जी.प.सदस्य सुधाकर दंडवते यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या नवीन शाळा खोलीचे उद्घाटन डिजिटल क्लास रूमचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते होते.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक अशोक तिरसे,सोमनाथ घुमरे,सोमनाथ चांदगुडे,निवृत्ती घुमरे,सदाशिव देशपांडे,श्रीराम राजेभोसले,शिवराम भारती,रावसाहेब भारती,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर भारती,भाऊसाहेब भारती,भाऊसाहेब चव्हाण,पंचायत समिती उपअभियंता उत्तम पवार,शाखा अभियंता पी.एम.शिंदे,राहुल जगधने,सरपंच श्रीम.शालिनी गोधडे,उपसरपंच वैशाली चव्हाण,सदस्य कल्पना भारती, सुनिता आहेर,ज्योती शिंदे,नवनाथ चव्हाण,सतीश कोकाटे,नाना सोनवणे,ग्रामसेवक पी.एम.गावित आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की,”कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षणाचे महत्व अधोरेखित झाले आहे.ऑनलाईनच्या माध्यमातून जागतिक स्तरावर सर्व क्षेत्रात सर्वच प्रकारचे व्यवहार होत असतांना ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नये यासाठी डिजिटल क्लासरूम मोलाची भूमिका बजावणार आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील सर्वच शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आ. काळे यांनी यावेळी सांगितले. हंडेवाडी ग्रामपंचायतीने या शाळेसाठी पेव्हर ब्लॉक बसविले व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी अॅरो दिल्या बद्दल त्यांनी हंडेवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व त्यावेळी त्यांनी तेथे सुरु असलेल्या हंडेवाडी ग्रामपंचायत कार्यालय इमारतीच्या बांधकामाची मान्यवरांच्या उपस्थितीत पाहणी केली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक रामेश्वर चत्तर यांनी केले व उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर सांबरे यांनी मानले.