जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

..या गावात सरपंच यांच्या कार्याचा झाला गौरव

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावात नुकतेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त प्रशासक बी.जे.देशमुख यांनी गावातील शेतकऱ्यांना शेतमाल प्रक्रिया उत्पादन, साठवण,विक्री शेतीतील समस्या,या विषयावर सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहे.

म्हाळादेवी गावचे सरपंच प्रदीप हासे यांनी आपल्या कालखंडात खांडेश्वर देवस्थानचे रुपडे बदलून टाकून गावाचा विकास केल्याने त्यांचा सत्कार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

आपल्या या पंचवीस वर्षांत त्यांनी गावाचा चेहरामोहरा बदलला व तालुक्यात एक आदर्शगाव निर्माण केले.त्यांचा ही सत्कार ग्रामस्थाच्यावतीने करण्यात आला.त्याच बरोबर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती.देशमुख मॅडम यांनी ही गावात सहा वर्षे सेवा केली.त्यांची येथून बदली झाली.त्यामुळे त्यांचाही सत्कार बी.जी.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.त्यांच्या जागेवर आलेले श्री रहाणे यांचे ग्रामस्थाच्यावतीने स्वागत केशवराव नवले यांनी केले. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांची मुदत ३० आक्टोबरला संपली. या सर्व सदस्या चा सत्कार यावेळी करण्यात आला. यात उपसरपंच प्रदीप हासे,सरपंच म्हणून राहिलेल्या मंजूळाबाई काशिनाथ उघडे,एकनाथ उमा उघडे,विजय अशोक हासे,आशा भास्कर हासे,संगिता विलास संगारे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रदीर्घ काळ सेवा करणारे ग्रामपंचयातीचे सेवक लक्ष्मन गायकवाड यांचाही सरपंच प्रदीप हासे यांनी सत्कार केला.

या कार्यक्रमास जि. प.सदस्य रमेश देशमुख, केशवराव नवले,श्री देशमुख आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गावातील बळवंत मुंढे,सूर्यभान हासे,विठ्ठल हासे,पत्रकार रामलाल हासे, भरत हासे,विलास हासे, दिलीप हासे,धोंडीराम हासे,कैलास मुंढे,भास्कर हासे,दशरथ हासे,शांताराम संगारे,प्रकाश हासे,एकनाथ हासे, सुभाष हासे, कैलास हासे, रोहिदास वैष्णव, गुंजाळ, म्हस्के, मारुती हासे,उल्हास हासे,रमेश हासे, निवृत्ती उघडे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close