जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
‘कोपरगाव तालुक्यातील वारी येथील साई श्रद्धा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारी सुरक्षित अंतराचे नियम पाळत कोरोना काळात जिवाची पर्वा न करता सेवा देणारे डॉक्टर आरोग्य कर्मचारी,आशा सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी या कोविड योद्ध्यांचा नुकताच सन्मान केला आहे.
अजूनही सर्वांनी जबाबदारीने सामाजिक अंतर पाळुन मुखपट्यांचा वापर सातत्याने काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले मात्र या कठीन काळात परमेश्वराने वैद्यकीय क्षेत्रातील आमच्या बरोबरच सर्व सामान्य माणसाला सुरक्षित ठेवले महामारीचा उद्रेक झाला नाही.भविष्यात अजून काही काळ काळजी घेणे गरजेचे आहे-डॉ.डी.एम.दरंदले
कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार १५४ इतकी झाली आहे.त्यात ३२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७१ टक्के आहे.आतापर्यंत १२ हजार ३२५ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ४९ हजार ३०० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.४७ असा आढळला आहे.आता रुग्णसंख्या बऱ्याच कमी प्रमाणात आढळत आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धयांचा भूमिका महत्वाची ठरली आहे.हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.या योगदानाची दखल साई श्रद्धा पतसंस्थेच्या संचालक मंडळाने घेतली असून या कोरोना योद्धयांचा सत्कार करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच घेतला आहे.त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते रामेश्वर दुध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव जाधव होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके,सभासद उज्वला कानडे,डॉ.सर्जेराव टेके,डॉ.सुजित तांबे,डॉ.सचिन दरेकर,औषध निर्माता संजय पाखले,विशाल सांगळे,राहुल कहार,सतिश गायकवाड,रावसाहेब वाघ,अमित काबरा,माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे,फकीर टेके,कृष्णराव जाधव, गौतम डोशी,बच्चू गायकवाड,बाळासाहेब नेवगे,माजी पं.स सदस्य दिवाकर निळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.निखिल पाखरे,डॉ.प्रमोद सुळे,जेष्ठ संचालक प्रकाशराव कर्डे पाटील,अँड शरद जोशी,विशाखा निळे , यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात नामदेवराव जाधव यांनी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत संचालक मंडळाला धन्यवाद देऊन शुभेच्छा दिल्या.कोरोना काळात दाखविलेल्या धाडसाचे कौतुक करुन कोव्हीड योद्ध्यांचा साई श्रद्धा पत संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र,शाल,पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या संचालक मंडळाच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी साई श्रद्धा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्तविक केले.तर
कार्यक्रम यशस्वीते साठी साईश्रद्धा पतसंस्थेचे अध्यक्ष वाल्मिक जाधव,उपाध्यक्ष संतोष काबरा,संचालक जितेंद्र संचेती,गोकुळ पलघडमल यांचे सह पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय चौधरी,संजय कर्पे,रामेश्वर कानडे आदींनी प्रयत्न केले.