नगर जिल्हा
महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार प्रसार करावा- गुलदगड
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महात्मा फुलेंनी लिहुन ठेवलेल्या “शेतकऱ्यांचा आसुड”, गुलामगिरी, आदि ग्रंथाबरोबरच त्यांनी केलेल्या कार्याचा विचारांचा तसेच शेक्षणिक क्रांतीचा उपयोग सध्याच्या पिढीबरोबरच पुढील कित्येक पिढ्यांनाही होणार असल्यामुळे महात्मा फुलेंच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यात यावा असे प्रतिपादन श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी नुकतेच केले आहे.
आपणास सर्वोतपरी सहकार्य करु,सामाजिक बांधिलकी जोपासनाऱ्या सर्व सामाजिक संस्था,संघटनांना प्रशासनाचे नेहमिच सहकार्य राहिल-डॉ.भोसले-जिल्हाधिकारी
अहमदनगर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांचा श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य वतीने महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा आसुड, गुलामगिरी आदि ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भुषन सचिन भाऊसाहेब गुलदगड समवेत जिल्हाध्यक्ष अशोक तुपे,सावता परीषद जिल्हाध्यक्ष निखिल शेलार आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संघाने गेल्या १७ वर्षापासुन समाजाच्या विवीध मागण्यांसाठी देत असलेल्या लढ्याबद्दल सांगतांना संतश्रेष्ठ सावता महाराजांच्या जन्मभुमीस तिर्थक्षेञास “अ” वर्ग दर्जा मिळावा, फुले दाम्पत्यास “भारतरत्न” पुरस्कार मिळावा,प्रत्येक जिल्हा परीषद शाळेस क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे नाव देण्यात यावे. “११ मे महात्मा दिन” प्रशासकीय स्तरावर साजरा करण्यात यावा आदि लढ्यात आपले सहकार्य मिळावे अशा मागण्या नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांचेकडे यावेळी संघाच्या वतीने गुलदगड यांनी केली आहे.
सत्कारास उत्तर देतांना नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले म्हणाले कि,”आपणास सर्वोतपरी सहकार्य करु,सामाजिक बांधिलकी जोपासनाऱ्या सर्व सामाजिक संस्था,संघटनांना प्रशासनाचे नेहमिच सहकार्य राहिल.कोरोना काळात विवीध सामाजिक संघटनांनी केलेल्या कार्याचा उल्लेखही यावेळी आवर्जुन भोसले यांनी केला.यावेळी श्री संत सावता माळी युवक संघाबरोबरच विवीध सामाजिक संघटनांचे प्रतिनीधी उपस्थित होते.