कामगार जगत
गणेश व डॉ.विखे कारखान्याच्या गळिताबाबत सुनावणी !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशनगर येथील श्री गणेश सहकारी व डॉ.विखे पा.सहकारी या दोन साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सुरु करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानीं आपल्या थकीत देयकासाठी हरकत घेतल्याने या बाबत आगामी २० ऑक्टोबर रोजी याबाबत गाळप परवाना द्यायचा की नाही याबाबत नगर येथील प्रादेशिक सहसंचालक साखर यांचे कार्यालयात सुनावणी आयोजित केली असून त्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी रमेश देशमुख यांच्यासह २७ कामगारांना या सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठविण्यात आलेली असून या सुनावणीकडॆ शेतकऱ्यांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
गणेश सहकारी साखर कारखान्याच्या २७ कामगारांनी याबाबत नगर येथील प्रादेशिक सहसंचालक साखर यांना निवेदन देऊन याबाबत न्याय मागताना यावर्षीचा गळीत हंगामाचा परवाना गणेश सहकारी साखर कारखाना व प्रवरानगर येथील डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास या कारखाण्यास देऊ नये अशी मागणी १० ऑक्टोबर रोजी केली आहे.त्याला या कार्यालयाने नुकतेच दि.१३ ऑक्टोबर रोजी उत्तर पाठवले असून त्यात प्रादेशिक सहसंचालक यांचे कार्यालयात दुपारी ०१ वाजता सुनावणी आयोजित केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,गणेश सहकरी साखर करण्याचे अनेक कामगार सेवानिवृत्त होऊनही त्यांचे भविष्य निर्वाह निधी,पगार,अन्य थकीत हक्काची देयके गणेश सहकारी साखर कारखान्याने अडवून ठेवली असून या कामगारांचा संचालक मंडळाकडून छळ सुरु आहे.या बाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून युवा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अड्.अजित काळे या कामगारांच्या वतीने त्यांची बाजू मांडत आहे.दरम्यान या २७ कामगारांनी याबाबत नगर येथील प्रादेशिक सहसंचालक साखर यांना निवेदन देऊन याबाबत न्याय मागताना यावर्षीचा गळीत हंगामाचा परवाना गणेश सहकारी साखर कारखाना व प्रवरानगर येथील डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास या कारखाण्यास देऊ नये अशी मागणी १० ऑक्टोबर रोजी केली आहे.त्याला या कार्यालयाने नुकतेच दि.१३ ऑक्टोबर रोजी उत्तर पाठवले असून त्यात प्रादेशिक सहसंचालक यांचे कार्यालयात दुपारी ०१ वाजता सुनावणी आयोजित केली असून त्यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे.या सूनावणीकडे नगर जिल्ह्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागून आहे.डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखाण्याने गणेश सहकारी साखर कारखान्याने सन-२०११ साली आठ वर्षासाठी भाडेतत्वावर चालविण्यास घेतलेला आहे.