नगर जिल्हा
लालपरीतून आता शासकीय धान्याची वाहतूक !
जनशक्ती न्यूजसेवा
बेलापूर-(प्रतिनिधी)
राज्य परिवहन विभागाची लाल परी अर्थात एस.टी.बस आता माल वाहतूक सेवेतही दाखल झाली आहे.यासाठी श्रीरामपुर कार्यशाळे अंतर्गत ३५ गाड्या सज्ज आल्या आहेत.आता एफसीआय गोदामातुन गहू,तांदूळ आदी शासकीय धान्याची पोती भरुन जिल्ह्यातील शासकीय गोदामात घेऊन जाणार असल्याने धान्याच्या काळ्या बाजाराला आळा बसण्यास मदत होणार आहे.
लाल परी शासकीय गोदामातुन शासकीय धान्य घेऊन तालुकाभर पोहोचवणार आहे. आता एफ सी आय गोदामातून लाल परीत शासकीय गहु, तांदूळ भरला जात आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गोदामात आता बसमधुन वाहतूक केली जाणार आहे.
लाँकडाऊन काळात प्रवासी वहातुक बंद असल्यामुळे एस.टी. महामंडळ तोट्यात आले.बसस्थानके ओस पडली. मग एस टी महामंडळाने वाहतुक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला.श्रीरामपुरातही एस.टी.बसने माल वहातुक सुरु करण्यात आली. इतर मालाची वाहतूक योजना यशस्वी झाल्यानंतर आता लाल परी शासकीय गोदामातुन शासकीय धान्य घेऊन तालुकाभर पोहोचवणार आहे. आता एफ सी आय गोदामातून लाल परीत शासकीय गहु, तांदूळ भरला जात आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गोदामात आता बसमधुन वाहतूक केली जाणार आहे. बसमधुन शासकीय मालाची वाहतूक सुरू झाली आहे.इतर खाजगी वाहनातून धान्य वाहतूक केली जात आहे मात्र त्यात गैरप्रकार घडत होते. आता गैरप्रकाराला निश्चितच आळा बसणार आहे.
दरम्यान श्रीरामपुर कार्यशाळेत श्रीरामपुर,नेवासा,कोपरगाव, संगमनेर, अकोले आगारातील काही प्रवाशी बस बाहेर काढून त्यांचे रूपांतरण वाहतूक ट्रक मध्ये करण्यात आले आहे.एका गाडीतून दहा टन मालाची वाहतूक केली जाते.लॉक डाऊन नंतर वाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याला आतापर्यंत सुमारे एक कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्याची माहिती आगारप्रमुख तथा श्रीरामपुर एसटी कार्य शाळेचे प्रभारी यंत्र अभियंता राकेश शिवदे यांनी दिली आहे.