कोपरगाव तालुका
किसनराव कर्पे यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवाशी व प्रगतशील शेतकरी किसनराव सुखदेव कर्पे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.किसनराव कर्पे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दुग्ध व्यवसाय विस्तारित केला होता.ते स्व.नामदेवराव परजणे यांचे समर्थक होते.त्यांच्यावर गोदावरी नदी तीरावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने गोदावरी नामदेवराव परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी पंचायत समिती सदस्य कृष्णराव परजणे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.