कोपरगाव तालुका
माजी सरपंच होन यांचे कोरोनाने निधन !

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिशी)
कोपरगाव तालुक्यातील देर्डे-चांदवड येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच केशवराव तुकाराम होन (वय-७३) यांचे काल दुपारी कोरोनाच्या साथीत दुर्दैवी निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात जेष्ठ बंधू,पत्नी,चार मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर नगर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.केशवराव होन हे अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक म्हणून देर्डे-चांदवड व परिसरात परिचित होते.ते वीस वर्षांपूर्वी पाच वर्ष सरपंच तर त्या नंतर पुन्हा पाच वर्ष उपसरपंच म्हणून त्यांनी देर्डे-चांदवड ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शकपणे चालवला होता.त्यांना देर्डे-चांदवड येथील दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.तर वर्तमानात ते तंटामुक्ती ग्रामसमितीचे अध्यक्ष म्हणूनही तीन वर्ष काम पाहत होते.
स्व.केशवराव होन हे अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक म्हणून देर्डे-चांदवड व परिसरात परिचित होते.ते वीस वर्षांपूर्वी पाच वर्ष सरपंच तर त्या नंतर पुन्हा पाच वर्ष उपसरपंच म्हणून त्यांनी देर्डे-चांदवड ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शकपणे चालवला होता.त्यांना देर्डे-चांदवड येथील दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.तर वर्तमानात ते तंटामुक्ती ग्रामसमितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी तीन वर्ष काम पाहत होते.त्यानां आठ दिवसापूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने नगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते.तेथे त्यांच्या स्रावांची तपासणी करण्यात आल्यावर त्यानां कोरोनाने गाठवले असल्याचे निष्पन्न झाले होते.त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांची काल सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्यावर काल रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्यांच्यावर नगर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला आहे.त्यावेळी त्यांच्या धर्मपत्नी,दोन मुली,नातू असा परिवार उपस्थित होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.