आरोग्य
जास्त कोरोना शुल्क आकारणाऱ्यांवर कारवाई करा-योगेश वाणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात कोरोना बाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारण्यात येत असून हा या रुग्णावर अन्याय असून या बाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी याची दाखल घेऊन दोषींवर कारवाई कारवाई करावी अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव भाजपचे संघटन सरचिटणीस भाजपचे योगेश वाणी यांनी नुकतीच केली आहे.
काल या बाबत भाजपचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांनी लक्ष घातले आहे.व माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रश्नावर त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेऊन ज्या रुग्णालयांनी जास्त बिल आकारणी केली असेल त्यांची तपासणी करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.
त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,कोपरगाव येथील प्रसिद्ध व्यापारी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक चार दिवसांपूर्वी त्यांचा स्राव तपासणी अहवाल बाधित आल्याने ते हादरून गेले होते.त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्य देखील कोरोना संसर्ग बाधित झाले आहेत.मात्र कोरोना साथीच्या कालखंडात जर काही कोविड सेंटर जर जनतेची लूट करत असतील तर हि बाब अत्यंत दुर्दैवी मानली पाहिजे.समाज माध्यमांवर सध्या एक आवाजातील क्लिप गाजत असून ती एकूण आम्हालाही अत्यंत दुःख झाले आहे.त्यात ज्या कोविड सेंटरला रुग्ण भरती आहे तेथे लाखो रुपये त्यांच्याकडून रुग्णालयाने भरून घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.काल या बाबत भाजपचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांनी लक्ष घातले आहे.व माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रश्नावर त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेऊन ज्या रुग्णालयांनी जास्त बिल आकारणी केली असेल त्यांची तपासणी करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.या बाबत जिल्हाधिकाऱ्यानी आता एक लाख रुपयांपेक्षा जास्त बिल आले असेल तर आता त्या बिलाची भरारी पथकाकडून तपासणी होणार असल्याचे त्यांनी म्हटलें आहे.हि बाब नक्कीच कौतुकास्पद मानावी लागेल.त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.व कोविड केंद्राला शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार फी आकारण्यास सांगावे,अन्यथा अशा दोषी रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाई करून त्याच्या परवान्यावर टाच आणावी अशी मागणीही योगेश वाणी यांनी शेवटी केली आहे.व निवेदनाच्या प्रति माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवली आहे.