जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेस स्वच्छ सर्वेक्षणात,मोठा पुरस्कार !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
देश पातळीवर सर्व शहरांसाठी स्वच्छतेच्या विविध निकषानुसार नुकत्याच राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कोपरगांव नगरपरिषदेने सहभाग घेतला होता.त्याचा निकाल आज केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी जाहीर केला असून यात कोपरगाव नगर परिदषदेने देशाच्या पश्चिम विभागात आठरावे तर राज्यात सातरावे स्थान प्राप्त केले असल्याची माहिती प्राप्त झाली असून पालिकेच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्र,गुजरात,मध्य प्रदेश,राजस्थान,गोवा या पश्चिम विभागातील पाच राज्यातील पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या एकूण १३९ तर राज्यातील एकूण ४८ नगरपरिषदांपैकी कोपरगाव नगरपरिषदेस एकूण ३८७३.०३ इतक्या गुणांसह देशात १८ वे,तर राज्यात १७ वे तर नाशिक विभागात १६ वे मानांकन प्राप्त झाले आहे.या यशाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे,यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे.स्वच्छ,सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे.या अभियानास वाढता प्रतिसाद मिळत आहे.घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल.शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल,पर्यायाने देशही स्वच्छ राहिल.स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.त्यामुळेच पंतप्रधानांनी २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत देश स्वच्छ करण्याचा संकल्प स्वच्छ भारत अभियानातून मांडला आहे.त्यांचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेसह महाराष्ट्राचा हातभारही मोठ्या प्रमाणात लागला आहे.

कोपरगांव नगरपरिषदेस मिळालेल्या या मानांकनासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या यशाबद्द्ल आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सभापती,सर्व नगरसेवक नगरसेविका व नागरिक आदींनी अभिनंदन केले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेने अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ च्या स्पर्धेत भाग घेऊन शहरात घनकच-याचे व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया करण्याचा उपक्रम राबविला.शहरातील निर्माण होणार-या ओल्या कच-या पासून कंपोस्टखत निर्मिती केली तर सुका कचरा विलगीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावली होती.शहरामध्ये असलेली सार्वजनिक शौचालये,सार्वजनिक मुताऱ्या स्वच्छ ठेवल्या होत्या तसेच या स्पर्धेत नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन तक्रारींचा निपटारा करण्यात देखील नगरपरिषदेने आघाडी घेतली होती. इतर कामात देखील कायम सातत्य ठेवल्याने कोपरगांव नगरपरिषदेचे नाव देशाच्या प्रमुख स्थानी आल्याचे मानले जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेकरिता केंद्र,राज्य,व विभागीय अधिकारी व तांत्रिक तज्ञ यांच्याकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांनुसार नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे नोडल अधिकारी,सर्व विभागाचे अधिकारी,कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी,यांनी अथक परिश्रम घेवून शहरातील नागरिक,तसेच विविध संस्था,सामाजिक कार्यकर्ते,स्वच्छता दूत,यांच्या सहकार्याने शहरातील स्वच्छतेमध्ये सातत्य ठेवल्यामुळेच हे मानंकन कोपरगांव शहरास प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close