जाहिरात-9423439946
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या आरोग्य केद्रांतून नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुरु असलेली दुरुस्तीची कामे दर्जेदार व्हावीत अशी अपेक्षा आ.आशुतोष काळे यांनी एन.आर.एच.एम.च्या अधिकाऱ्यांशी बोलताना केली आहे.
गरीब दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेस सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात १२ एप्रिल २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केले आहे.
गरीब दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेस सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात १२ एप्रिल २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केले आहे. आरोग्यावर परिणाम करणाऱ्या त्यात महत्वाच्या घटकांचा आहार,परिसर स्वच्छता,सुरक्षित पाणीपुरवठा,महिला व बालविकास आदी बाबींचा या अभियानामध्ये एकत्रित विचार करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेच्याअधिकाऱ्यांसमवेत आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच पंचायत समिती कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीसाठी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जि.प.सदस्य सोनाली रोहमारे,सोनाली साबळे,प.स.सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने,अनिल कदम,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जिनिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, सुधाकर होन,प्रशांत वाबळे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,उपअभियंता जी.पी.काळे,कनिष्ठ अभियंता अजीज शेख,कार्यकारी अभियंता अंकुश पाटील,उपभियंता उत्तमराव पवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत पुढे बोलतांना ते म्हणाले की,”प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा कणा आहे.त्यादृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती करतांना ज्या गोष्टींची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे अशा गोष्टींच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे त्याबाबत सविस्तर अहवाल तयार करून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांना अजूनही काय सुविधा देता येतील यासाठी प्रयत्न करावा व शक्य असल्यास दुरुस्तीच्या आराखड्यात बदल करावा.प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती करतांना कामाचा दर्जा उच्च असावा. दुरुस्ती कामात केलेली दिरंगाई सहन केली जाणार नाही अशी ताकीद आ. काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिली आहे.