कोपरगाव तालुका
पाच लाखासाठी महिलेचा छळ,सात जणांवर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरानजीक रहिवाशी असलेल्या समतानगर या उपनगरात रहिवासी असलेल्या माहिलेने आपल्या माहेरून नवऱ्याने करून ठेवलेले कर्ज फेडण्यासाठी पाच लाख रुपये आणावे या साठी आपला शारीरिक,मानसिक छळ केल्या प्रकरणी आरोपी श्रीकृष्ण बबनराव पवार,बबनराव बाळाजी पवार,सिंधुबाई बबनराव पवार,सुनील बबनराव पवार,अनिल बबनराव पवार,वनिता सुनील पवार,पौर्णिमा अनिल पवार सर्व रा .समतानगर यांचे विरुद्ध फिर्यादी महिला विशाखा कृष्णा पवार (वय-३०) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिलेचे कृष्णा पवार यांचेशी दि.२० एप्रिल २००९ रोजी लग्न झाले होते.सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरचे नवरा,सासू,सासरे अन्य मंडळींनी माहेराहून पैसे आणावे म्हणून त्रास द्यायला सुरुवात केली.व फिर्यादी महिलेवर तिच्या माहेरून नवऱ्याने व त्यांचे नातेवाईकांनी संगनमताने नवऱ्याने केलेले कर्ज फेडण्यासाठी माहेराहून पैसे आणावे या साठी तिचा लग्न झाले पासून दोन वर्षांपासून छळ सुरु केला असल्याचे म्हटले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात समतानगर या उपनगरात फिर्यादी महिलेचे कृष्णा पवार यांचेशी दि.२० एप्रिल २००९ रोजी लग्न झाले होते.सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरचे नवरा,सासू,सासरे अन्य मंडळींनी माहेराहून पैसे आणावे म्हणून त्रास द्यायला सुरुवात केली.व फिर्यादी महिलेवर तिच्या माहेरून नवऱ्याने व त्यांचे नातेवाईकांनी संगनमताने नवऱ्याने केलेले कर्ज फेडण्यासाठी माहेराहून पैसे आणावे या साठी तिचा लग्न झाले पासून दोन वर्षांपासून छळ सुरु करून तो दि. १९ डिसेंबर २०१९ पर्यंत शारीरिक,मानसिक छळ केला असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.या दरम्यान तिला मारहाण करून शिवीगाळ करून तिला घराबाहेर काढले आहे या प्रकरणी तिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात काल दुपारी १२.३७ वाजेच्या सुमारास आरोपी श्रीकृष्ण बबनराव पवार,बबनराव बाळाजी पवार,सिंधुबाई बबनराव पवार,सुनील बबनराव पवार,अनिल बबनराव पवार,वनिता सुनील पवार,पौर्णिमा अनिल पवार सर्व रा .समतानगर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी गु.र.नं.२८२/२०२० भा.द.वि.कलम ४९८ (अ),३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.