कोपरगाव तालुका
..या गावात अवैध दारू विक्री,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत ग्रामसभेने अवैध दारूबंदी केलेली असताना तेथील आरोपी रामदास गंगाधर कुऱ्हाडे रा.धामोरी हा इसम काल सायंकाळी ५.१५ वाजता त्याचे घराचे आडोशाला अवैध दारूविक्री करताना आढळून आल्याने कोपरगाव तालुका पोलिस किशोर विठ्ल कुलधर यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने धामोरीत अवैध दारू विक्री करणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
धामोरी येथील आरोपी रामदास गंगाधर कुऱ्हाडे हा आपल्याच घराच्या आडोशाला हि अवैध दारू विक्री करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या.त्या नुसार पोलिसानी या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी वरील रामदास गंगाधर कुऱ्हाडे नामक आरोपी अवैध दारू विक्री करताना आढळून आला.घटनास्थळी धाड टाकली असता तो फरार झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत अवैध दारू विक्रीस या ग्रामसभेत बंदी घातली आहे.हे माहिती असूनही काही ग्रामद्रोही इसम गावाच्या शांतीला गालबोट लावण्याचे धाडस करत आहे.त्यामुळे ग्रामस्थांत या विकृतीविरुद्ध अच्छा-खांसा राग आहे.तरीही काही नागरिक पैशाच्या लोभाने हे कृत्य करीत असल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे.आरोपी रामदास गंगाधर कुऱ्हाडे हा आपल्याच घराच्या आडोशाला हि अवैध दारू विक्री करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या.त्या नुसार पोलिसानी या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी वरील रामदास गंगाधर कुऱ्हाडे नामक आरोपी अवैध दारू विक्री करताना आढळून आला.घटनास्थळी धाड टाकली असता तो फरार झाला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पॊलीसानी या आरोपी विरुद्ध गु.र.नं.१४९/२०२० महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.व आरोपी कुऱ्हाडे याच्या कडील ९८८ रुपये किमतीच्या १९ देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या १८० मी.ली.च्या सीलबंद क्वार्टर प्रत्येकी किंमत ५२ रुपये असलेल्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.चंद्रकांत तोर्वेकर हे करीत आहेत.