कोपरगाव तालुका
..या ठिकाणी तहसीलदारांनी तरुणांना फटकावले !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ठाणे येथून प्रवास करुन आलेल्या कोपरगांव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीला कोरोना संसर्ग विषाणूची लागण झाली झाल्याचे उघड झाला असले तरी तालुका प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक समितीने सुरुवातीपासून संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवल्याने परिस्थिती नियंत्रणात असून मुलीचे संपर्कातील सर्वांची माहिती संकलित करून सर्वांना तातडीने विलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.दरम्यान ते या गावावरून परतत असताना त्यांना संवत्सर चौफुलीवर काही टवाळखोर तरुण आपल्या तोंडावर मुखपट्या न बांधताच बसलेले आढळल्याने त्यांनी आपली गाडी थांबवून व एक काठी उपलब्ध करून या तरुणांना चांगलेच फाटकावून काढल्याने या तरुणांची एकाच पळापळ झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे.
तहसीलदार चंद्रे हे परत येत असताना संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत नागपूर-मुंबई महामार्गावरील चौफुलीवर तोंडाला मुखपट्या न बांधणारे तरुण घोळका करून बसलेले आढळले त्यांना काठी हातात घेऊन चांगलाच हिसका दाखवला आहे.त्यामुळे या तरुणांची पळापळ करताना चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले आहे.कोपरगाव शहर व तालुका हद्दीत अजूनही बरेच बेपर्वा तरुण दिसून येत असून त्यांना या साथीचे गांभीर्य दिसून येताना दिसत नाही.त्यामुळे पोलीस आणि तालुका प्रशासनांस अशीच भूमिका घेणे आवश्यक ठरणार आहे.
कोरोनाने सर्वत्र कहर केला असून अद्यापही कोरोना नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही.आता तर कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.आता पर्यंत कोपरगाव तालुका कोरोना मुक्त करण्यात तालुका प्रशासनाने यश मिळवले होते.मात्र तीन दिवसांपूर्वी पुन्हा एक महिला डॉक्टर कोरोना बाधित आढाली असून त्या पाठोपाठ ठाणे येथून दोन नातवांना घेऊन येणारे आजोबानां धोत्रे ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्षात ठेवल्याने धोत्रे गावातील संकट टळले आहे.तरीही प्रशासन बेसावध नाही आज तहसीलदार,पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गावात जाऊन टाळेबंदीची पाहणी केली व आवश्यक सूचना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनास दिल्या आहेत.व येताना संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत नागपूर-मुंबई महामार्गावरील चौफुलीवर तोंडाला मुखपट्या न बांधणारे तरुण घोळका करून बसलेले आढळले त्यांना काठी हातात घेऊन चांगलाच हिसका दाखवला आहे.त्यामुळे या तरुणांची पळापळ करताना चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले आहे.कोपरगाव शहर व तालुका हद्दीत अजूनही बरेच बेपर्वा तरुण दिसून येत असून त्यांना या साथीचे गांभीर्य दिसून येताना दिसत नाही.त्यामुळे पोलीस आणि तालुका प्रशासनांस अशीच भूमिका घेणे आवश्यक ठरणार आहे.
कोपरगांव शहरातील कोरोणा संसर्ग विषाणू बाधित महिलेच्या संपर्कातील १६ व लोणी येथील कोरोणा संसर्ग विषाणू बाधित पुरुष यांचे संपर्कातील १ अशा अतिदक्षता एकूण १७ नागरिकांचे घषातील श्राव पुढील चाचपणी साठी पाठविण्यात आले होते.त्यातील सर्व १७ अहवाल कोरोना लागण नकारात्मक असे आले आहे.
दरम्यान कोपरगांव शहरातील कोरोणा संसर्ग विषाणू बाधित संपर्कातील आणखी काही नागरिकांचे संपर्क बाबत माहितीचे संकलन झाले असून त्या नागरिकांचे व कोपरगांव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीच्या कुटुंबातील सदस्यांचे घषातील श्राव घेवुन पुढील वैद्यकीय चाचपणी प्रक्रिया सुरु झाली आहे.आगामी काळात नागरिकांनी सतर्क राहुन कोरोना संसर्ग विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार चंद्रे यांनी शेवटी केले आहे.