कोपरगाव तालुका
कोपरगावात न्यायालये ..या वारी सुरू होणार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील न्यायालय सोमवार दि.८ जून पासून काही अंशी सूरू होणार असल्याची माहिती कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अँड. शिरीष लोहकणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
न्यायालय कामकाजा करताना नेमलेली प्रकरणाची यादी (बोर्ड) एक दिवस आधी बाहेर लावली जाईल.कामकाजासाठी नेमलेले पक्षकार व वकील यांनीच न्यायालयात यावे तसेच वकिल कनिष्ठ वकील,कारकुन यापैकी एकच जण न्यायालयीन सभागृहात मध्ये पुकारल्या नंतर जाता येईल वकिलांची बार रूम बंद राहील.वकीलाचे टेबल जवळ काम असेल तरच बसता येईल,वकीलाचे कारकुन किंवा वकील यापैकी एकालाच न्यायालयात येता येईल जो खटला पुकारला त्याच खटल्याचे वकील किवा अशील यांना न्यायालया मध्ये जाता येईल-अड्.लोहकणे
देशभरात कोरोना साथीचा कहर सुरु झाल्या नंतर सर्व न्यायालये सरकारने अपवाद वगळता बंद केली होती.मात्र आता कामकाज सुरु करण्याकडे सरकारचा कल असून त्या बाबत जिल्हा पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार सोपवून धोकादायक क्षेत्र वगळता सर्व न्यायालये सुरु करण्याचे आदेश दिले आहे.त्यानुसार नुकतीच जिल्हा न्यायाधीश एन.एन.श्रीमंगले,आर.बी.भागवत, वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमाईस.एन.सचदेव,व्ही.यू.मिसाळ,जे.एम.पांचाळ,ए.सी.डोईफोडे,आर.ए.शेख कनिष्ठ स्तर,या सह वकील संघाचे सदस्य बहुसंख्येने आदी मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांनी स्वतः पिण्याचे पाणी सोबत आणावे तसेच हात स्वच्छतेचे साहित्य सोबत आणावे,ज्याचे फलकावर कामे नसतील यानी तुता॓स न्यायालयात येणे टाळावे.प्रतिज्ञापत्रे हि न्यायालयाच्या बाहेरच फाटकाजवळ बांबूच्या फाटकाच्या बाहेर गर्दी टाळण्यासाठी देण्यात येणार आहेत.नवीन दाखल प्रकरणे याच ठिकणी दाखल होणार आहेत.सर्वांची गैरसोय होणार आहे पण आपण गेल्या तीन महिन्या पासून न्यायालयीन कामकाज बंद असल्याने हे नियम सर्वांचे हितार्थ अपरिहार्य आहे-अड्.अशोक टुपके माजी अध्यक्ष वकील संघ
यावेळी उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना नूसारच कामकाज करावे त्या प्रमाणे न्यायालयीन कामकाज दोन सत्रात म्हणजेच १०:३० ते १:३० व २:३० ते ५:३० या वेळात सुरू राहील प्रत्येक सत्रात वेगळे न्यायाधिश असतील प्रत्येक न्यायालयात रोज १५ प्रकरणे सुनावणीसाठी असणार आहे.असतील त्यात निकालाचे,युक्तीवादाचे,तसेच मनाई हुकूम,निकाल देणे आदी कामे घेतले जातील तसेच न्यायालय कामकाजा करिता नेमलेली प्रकरणाची यादी (बोर्ड) एक दिवस आधी बाहेर लावला जाईल.कामकाजासाठी नेमलेले पक्षकार व वकील यांनीच न्यायालयात यावे तसेच वकिल कनिष्ठ वकील,कारकुन यापैकी एकच जण न्यायालयीन सभागृहात मध्ये पुकारल्या नंतर जाता येईल वकिलांची बार रूम बंद राहील.वकीलाचे टेबल जवळ काम असेल तरच बसता येईल, वकीलाचे कारकुन किंवा वकील यापैकी एकालाच न्यायालयात येता येईल जो खटला पुकारला त्याच खटल्याचे वकील किवा अशील
यांना न्यायालया मध्ये जाता येईल. त्याच प्रमाणे वकील,पक्षकार आरोपी हजर नसल्यास कोणताही एकतफी॓ हुकुम,दावे निकाली काढणे,अजामीन पात्र अटक वारन्ट काढणे आदी हुकूम होणार नाहीत.आजारी अशील व वकील यानी काही दिवस न्यायालयात येणे टाळावे.तसेच प्रकरणे दाखल करताना करावयाची प्रतिज्ञा पत्र करण्यासाठी फाटकावर व्यवस्था करण्यात येणार आहे.नागरिकांनी स्वतः पिण्याचे पाणी सोबत आणावे तसेच हात स्वच्छतेचे साहित्य सोबत असावे,ज्याचे फलकावर कामे नसतील यानी तुता॓स न्यायालयात येणे टाळावे.सर्वांची गैरसोय होणार आहे पण आपण गेल्या तीन महिन्या पासून न्यायालयीन कामकाज बंद असल्याने हे नियम सर्वांचे हितार्थ अपरिहार्य असल्याचेही अँड.लोहकणे व अड्.अशोक टुपके यांनी शेवटी सांगितले आहे.