कोपरगाव तालुका
..या गावात बीज प्रक्रिया शेतीशाळा संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कुभांरी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुभांरी येथे कोळपेवाडी कृषि विभाग मंडळाच्या वतीने सकाळी ८ तॆ ९ या वेळेत सोयाबीन बीज प्रक्रिया कशी राबवावी याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
यावेळी करोना च्या काळामध्ये सुरक्षित अंतर ठेवुन कृषी विभागाच्या वतीने कृषि अधिकारी निलेश बिबवे यांनी उपस्थित उगवन क्षमतेची व कृषि विभागाच्या योजनाची माहिती दिली.यावेळी गावातील रमन गायकवाड़, श्रीराम घुले,बापु निळकंठ,गहिनीनाथ घुले,बाबासाहेब भारती,अशोक गायकवाड यांचेसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.