कोपरगाव तालुका
कोपरगावात साई पारायण सोहळा उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील साई कथाकार ह.भ.प.बाळकृष्ण सुरासे महाराज यांचे मार्गदर्शनाखाली गुरुपुष्यांमृत पर्वणी मुहुर्तावर घरीच साई पारायण सोहळा हा उपक्रम टाळेबंदीमध्ये दुसऱ्यादा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
संपुर्ण मानव जातीवर आलेले कोरोना महामारीचे संकट कायम स्वरूपी जाण्यासाठी ही बाबांना केलेली सामुदायिक प्रार्थना असून यात नाव नोंदणीची गरज नाही.मात्र आपला अर्धा तास प्रत्येकाने द्यायचा आहे तो ही आपापल्या घरीच असे आवाहन सुरासे महाराज यांनी सामाजिक संकेतस्थळावर केले होते त्याला देशभरातून साई भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला व साईभक्तांच्या व्हाट्सअप ग्रुप वर नोंदणी केली त्यातुनच ५३ गावांची निवड करण्यात आली होती.
आपापल्या घरीच साईचरिञ पारायण या उपक्रमासाठी ५३ अध्यायासाठी ५३ गावांची निवड शिर्डी येथे द्वारकामाई समोर साईभक्त मा प्रकाश कुलकर्णी ( बाबांचे सेवक वै.लक्ष्मणमामा यांचे नातू )यांचे हस्ते चिठ्या काढून करण्यात आली होती.संपुर्ण मानव जातीवर आलेले कोरोना महामारीचे संकट कायम स्वरूपी जाण्यासाठी ही बाबांना केलेली सामुदायिक प्रार्थना असून यात नाव नोंदणीची गरज नाही.मात्र आपला अर्धा तास प्रत्येकाने द्यायचा आहे तो ही आपापल्या घरीच असे आवाहन सुरासे महाराज यांनी सामाजिक संकेतस्थळावर केले होते त्याला देशभरातून साई भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला व साईभक्तांच्या व्हाट्सअप ग्रुप वर नोंदणी केली त्यातुनच ५३ गावांची निवड करण्यात आली होती.गुरुवारी गुरुपुष्पामृत योगावर सुरासे महाराज यांचे सूचनेवरून वारी येथील साई भक्त श्री अशोक कानडे हे त्यांच्या फेस बुक लाईव्ह वर आले व साईनाथ स्तवन मंजिरी घेऊन कोरोना महामारीपासून रक्षणासाठी प्रार्थना केली ह.भ.प.सुरासे महाराज यांचे आणि सर्व सहभागी पारायनार्थी साई भक्तांचे आभार मानून पारायण करणाऱ्या सर्वांना आपआपले अध्याय घेण्यास सांगितले.सदर उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे