कोपरगाव तालुका
कोपरगावात दोन गटात तुंबळ हाणामारी,नऊ जणांवर तीन गुन्हे दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील संजयनगर भागातील आयेशा कॉलनीत दोन गटात मागील भांडणाच्या कारणावरून रॉड व दगडाने झालेल्या हाणामारीत दोन गटातील अफ़्रिद बशीर शेख,अफान मुश्ताक शेख, मुन्ना राजू शेख, शकील मेहबूब शेख,शकील इस्माईल कुरेशी,सोफियान सलीम कुरेशी,जावेद युसूफ शेख,वसीम युसूफ शेख,अजीज कासम खाटीक आदी नऊ जणांवर पोलिसानी गुन्हा दाखल केला असून फिर्यादी वसीम युसूफ शेख,(वय-३२) व अजीज कासम कुरेशी (वय-३६) दोघे रा.आयेशा कॉलनी यांनी एकमेकांच्या गटाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.त्या मुळें संजयनगर भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक यांनीही भेट दिली आहे.घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे.या घटनेत अजीज कासम कुरेशी व वसीम युसूफ शेख हे दोघे गंभीर जखमी झाला आहे.दरम्यान यात काही पोलिसानी या घटनेत नगरपालिकेतील एका सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने आपले हात ओले केल्याची कुजबुज या परीसरात सुरु आहे.
सध्या कोरोनामुळे राज्यात चौथी टाळेबंदी सुरु आहे.यात नागरिकांनी सरकारने दिलेले आदेश पाळणे गरजेचे आहे.मात्र कोपरगावमधील संजयनगर या उपनगरात आयेशा कॉलनीत रहिवाशी असलेल्या वसीम युसूफ शेख व अजीज कासम कुरेशी यांच्या मागील भांडणाच्या कारणावरून नुकतेच भांडण उद्भवले आहे.त्यात वसीम कुरेशी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आरोपी अजीज कुरेशी शकील शेख,सोफियान कुरेशी,अकील बशीर कुरेशी,मुन्ना कुरेशी,अफान शेख यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचे घरात अनाधिकाराने प्रदेश करून,”तू दुपारी अजीम कुरेशी व इस्माईल कुरेशी यांच्यात झालेले भांडण का सोडवले ? असे म्हणून आपल्याला शिवीगाळ करून लाथाबुक्य्यांनी मारहाण केली.व आरोपी अजीज कुरेशी याने त्याच्या हातातील दगडाने आपल्या डोक्यात मारून दुखापत केली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटलें आहे.तर दुसऱ्या फिर्यादीत अजीज कुरेशी याने आरोपी वसीम शेख,शकील कुरेशी,जावेद शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”वरील आरोपीनी संगनमत करून फिर्यादिस तू दुपारी इस्माईल कुरेशी यास का मारले ? असे म्हणून शिवीगाळ करून आरोपी वसीम शेख याने त्याचे हातातील रॉडने आपल्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी दोन्ही गटाचे एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.या खेरीज कोरोना टाळेबंदी असल्याने त्यांनी आपल्या तोंडास मुख पट्टी न बांधता मोठमोठ्याने आरडाओरडा करून एकमेकांशी भांडण करून झुंज करताना व सार्वजनिक शांतता भंग करताना व जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशाचा भंग करताना आढळून आले असल्याचे म्हटलें आहे.त्या दोन्ही गटातील नऊ जणांवर शहर पोलिसानी गु.र.न.१७८/२०२० भा.द.वि.कलम १६०,१८८ (२),२६९,२७०,२९०,३४,मुंबई पोलीस कायदा कलम ११०/११२ प्रमाणे तर आरोपी आणि फिर्यादी यांनी एकमेकांविरुद्ध असे तीन गुन्हे दाखल केले आहे.पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.