मनोरंजन
कोरोना जनजागृती चित्रकला स्पर्धा निकाल जाहिर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात सर्वच क्षेत्रानां कोरोनाने प्रभावित केले असून त्यात चित्रकलाही अपवाद नाही जगात हाहाकार निर्माण करणाऱ्या या साथीवर अद्याप पर्याय निर्माण झालेला नाही व साथ आटोक्यात आणण्यासाठी अद्याप लसही निर्माण झालेली नाही.या प्राप्त परिस्थितीत चित्रकलेला मात्र एक नवीन विषय मात्र जरूर मिळाला आहे.याच संकटात संधी शोधण्याचे काम या क्षेत्रातील तज्ज्ञांनी न केले तर नवल ! या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय फुलगाव व सुयश दिनदर्शिका कोरेगाव भीमा यांनी केले असून चित्रकला प्रेमी विद्यार्थ्यांना संधी निर्माण करून दिली आहे.
राज्यात या विषाणूने ११९८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ७५ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ जून पर्यंत केली आहे.शाळा महाविद्यालये अनेक महिन्यापासून बंद आहे.या प्राप्त परिस्थितीत विद्यार्थ्यांची प्रतिभा बंदिस्त करणे तसे अवघडच त्यांना ती व्यक्त करण्यासाठी हरी उद्धव विद्यालयाने संधी निर्माण करून दिल्याने अनेकांना समाधान वाटले आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७९३ हजारने वाढून ती ९६ हजार ४९२ इतकी झाली असून ३०४१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ३३ हजार ०५३ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ११९८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ७५ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ जून पर्यंत केली आहे.शाळा महाविद्यालये अनेक महिन्यापासून बंद आहे.या प्राप्त परिस्थितीत विद्यार्थ्यांची प्रतिभा बंदिस्त करणे तसे अवघडच त्यांना ती व्यक्त करण्यासाठी हरी उद्धव विद्यालयाने संधी निर्माण करून दिल्याने अनेकांना समाधान वाटले आहे.उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेचे निकाल नुकतेच हाती आले आहे.
सदरचे निकाल पुढिल प्रमाणे लहान गट चित्रकला-शेगुणशी विनायक विरुपक्षाप्पा -फ्रेंड्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूट कोरेगाव भिमा व हस्तकला,सांगळे अनुजा महादेव-पांडुरंग विद्यालय विठ्ठलवाडी तर मोठ्या गठ-खळदकर सर्वज्ञ अनिल -हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय फुलगाव व ढवळे प्रिया रमेश-अभिनव विद्यालय सरदवाडी यांनी प्रथम पारितोषिके घेतली आहेत.
या स्पर्धेत ६५ शाळा व २०० विद्यार्थी सहभागी झाले होते.टाइम इंटरनॅशनल स्कूल लोणीकंद,स्व.राजकुमार गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे,रावसाहेब पवार स्कूल वडगाव रासाई,अभिनव विद्यालय सरदवादी,भारतीय जैन संघटना वाघोली,या शिवाय जि.प.प्राथमिक शाळा पंचायत समिती हवेली व पंचायत समिती शिरुर गटातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेचे आयोजन हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद वाखारे,के.डी.गव्हाणे,सत्यसाई सेवा केंद्राचे अध्यक्ष सुनील वागस्कर यांनी मार्गदर्शन केले.या स्पर्धेचे परीक्षण व संयोजन प्रविणकुमार जगताप कलाशिक्षक,श्रीरंग जाधव,सतीश केकाण,रमेश पाटील यांनी केले आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम कोरोनाची टाळेबंदी संपल्यावर घेण्यात येणार आहे.या बाबत संबंधिताना त्या वेळी माहिती कळवण्यात येणार आहे.