नगर जिल्हा
..या परिसरात गांजा विक्री,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
शिर्डी-(प्रतिनिधी)
शिर्डी शहरात असलेल्या कालिकानगर उपनगरात रहात असलेला एक इसम गफुर जैमुददीन शेख हा गांजा विकत असल्याची खबर मिळताच शिर्डी पोलीसांनी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने सांपाळा लावुन गफुर जैमुददीन शेख याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली असता त्याने दोन किलो ८०० ग्रम वजनाचा गांजा काढून दिला आहे.त्याच्यावर शिर्डी पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.
शिर्डी नगरपंचायत हद्दीतील कालिकानगर उपनगरात रहात असलेला एक इसम गफुर जैमुददीन शेख हा गांजा विकत असल्याची खबर मिळताच शिर्डी पोलीसांनी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने सांपाळा लावुन गफुर जैमुददीन शेख याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली असता त्याने दोन किलो ८०० ग्रम वजनाचा गांजा काढून दिला आहे.
आरोपी गफूर शेख याच्या विरोधात मिथुन घुगे यांच्या फिर्यादीवरून गुगीकारक औषधीद्रव्य प्रतिबंधक अधिनियम १९९५ चे कलम २०(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहता न्यायालयात हजर केले असता ५ दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. शिर्डी शहरात अशा प्रकारे कोणी गांजाची विक्री करत असेल आणुन देत असेल अशा लोकांची माहिती शिर्डी पोलीसांना द्यावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.या कारवाईत पोलिस कर्मचारी पी. डी.अंथारे,बाबा सातपुते, गणेश गायकवाड, फिरोज शेख, संचिन पगारे, बी. एस. वर्प, एस आर भागवत यांनी सहभाग घेतला होता.शिर्डी परिसरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.