कोपरगाव तालुका
सुरेगाव येथील चौघे संशयित नगरला हलविले !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात १० एप्रिल नंतर कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नसताना आज येवला येथील एका कोरोनाची लागण असलेल्या रुग्णांशी संबंध आल्यामूळे सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील पति-पत्नी व दोन मुले असे चार जणांना खबरदारीचा उपाय म्हणून तालुका आरोग्य विभागाने नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना केले असल्याची माहिती कोपरगावचे आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.त्यामुळे सुरेगाव परिसरात भीतीचे वातावरण तयार झाला आहे.
दरम्यान कोपरगाव आरोग्य विभागाने अन्य पूर्व सुरक्षा म्हणून ३७ व्यक्तींना सुरेगाव येथील संभाजी विद्यालय व राधाबाई कन्या विद्यालय येथे संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे.या नागरिकांना शोधण्यात व त्यांना विलगीकरण करण्यात तहसीलदार योगेश चंद्रे,पोलीस निरीक्षक अनिल कटके,आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,वैद्यकीय अधिकारी डॉ.आढाव,तेथिल सरपंच शशिकांत वाबळे,पोलीस पाटील संजय वाबळे,ग्रामसेवक नारायण खेडकर,तलाठी गणेश गडकर,आरोग्य सेविका तरोळे मॅडम,नितीन पाटील आदींनी सहकार्य केले आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १७५ ने वाढून ती ५६ हजार १८२ इतकी झाली असून १७९० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या १६ हजार ७५८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ६५१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ५३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव हि कोरोनाची नवी हॉटस्पॉट ठरली आहेत.जवळच येवला हे नवीन ठिकाण कोरोनाची डोकेदुखी ठरल्याने प्रशासन तणावात आले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.कोपरगाव तालुक्यात या आधीच दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.
सुरेगाव येथील एका गुन्ह्यातील आरोपीस घेऊन येवला येथील पोलीस व एक गार्ड हे प्रथम येवला येथील न्यायालयात गेले व नंतर त्या आरोपीचा जामीन फेटाळल्याने त्या आरोपीस घेऊन नाशिक येथे गेले होते.त्यास पोहचून ते परत येताना ते ज्या आरोग्य विभागाच्या एर्टीगा गाडीत आले त्यात एक डॉक्टर व एक नर्स कोरोनाची लागण झालेली होती मात्र त्यांचा अहवाल आलेला नव्हता मात्र दुसऱ्या दिवशी आल्याने त्या कोरोना पीडित डॉक्टरने हि बाब उघड केल्याने हि बाब निदर्शनास आली आहे.त्या नंतर हि कारवाई करण्यात आली आहे.
सुरेगाव येथील एका गुन्ह्यातील आरोपीस घेऊन येवला येथील पोलीस व एक गार्ड हे प्रथम येवला येथील न्यायालयात गेले व नंतर त्या आरोपीचा जामीन फेटाळल्याने त्या आरोपीस घेऊन नाशिक येथे गेले होते.त्यास पोहचून ते परत येताना ते ज्या आरोग्य विभागाच्या एर्टीगा गाडीत आले त्यात एक डॉक्टर व एक नर्स कोरोनाची लागण झालेली होती मात्र त्यांचा अहवाल आलेला नव्हता मात्र दुसऱ्या दिवशी आल्याने त्या कोरोना पीडित डॉक्टरने हि बाब उघड केल्याने हि बाब निदर्शनास आली आहे.त्यामुळे अधिकची जोखीम नको म्हणून तालुका आरोग्य विभागाने त्यांना आज ताब्यात घेऊन त्यांची पुढील तपासणीसाठी रवानगी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे केली आहे.त्यांना आज जरी काही लक्षणे दिसत नसली तरी आगामी काळात धोका नको म्हणून प्रशासनाने हि सावधानता बाळगली आहे.मात्र तरीही सुरेगाव परिसरात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.