निवडणूक
आ.काळे विजयी पण राष्ट्रवादी (श.प.)गटाचे म्हस्के पराभूत !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावमधील आ.आशुतोष काळे यांनी शेतीपूरक मतदारसंघातून 884 मतदारांपैकी 750 मते मिळवून विजय झाला असून त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुधीर म्हस्के यांना केवळ 124 मतांवर आपला गाशा गुंडाळावा लागला असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे आ.काळे समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला असून विजयी उमेदवार यांचे स्वागत केले आहे.त्यामुळे हा विजय म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान मतदानाच्या दिवशी काल आ.आशुतोष काळे,भाजप विधानपरिषद आ.विवेक कोल्हे,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे व चैताली काळे यांनी एकत्र येऊन मोठी खिडं लढवली असल्याचे मानले जात आहे.विशेषतः आमदार काळे यांची संपूर्ण यंत्रणा आणि कार्यकर्ते हे शंभर टक्के मतदान होण्यासाठी धावपळ करताना आढळून आले होते.विशेष म्हणजे मंत्री विखे पाटील यांचे मेहुणे तथा गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे देखील एकत्र आले असल्याचे दिसून आले असल्याचे तालुक्यात आश्चर्य मानले जात आहे.दरम्यान याचे पडसाद आगामी काळात रयत शिक्षण संस्थेत उमटणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती.मात्र शेती पूरक मतदार संघात दोन राष्ट्रवादीत हा सामना रंगला होता.त्यात आ.काळे हे अजित पवार गटाचे तर सुधीर म्हस्के हे शरद पवार गटाचे होते.परिणामस्वरूप ही निवडणूक लढाई रंजक ठरली होती.त्यामुळे या लढाईत खरा सामना हा जलसंदा मंत्री विखे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खा.सुधीर लंके यांच्यात रंगला असल्याचे मानले गेले होते.शेतीपूरक मतदारसंघातून अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे आ.आशुतोष काळे रिंगणात होते तर त्यांच्याविरोधात 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.शेवटच्या दिवशी 26 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर काळे यांच्याविरोधात एकमेव शरद पवार राष्ट्रवादीचे सुधीर रावसाहेब म्हस्के यांची उमेदवारी शिल्लक राहिली होती.सुधीर म्हस्के यांची माघार होऊन काळे बिनविरोध होणार असा कयास व्यक्त होत असताना तो सपशेल फोल ठरला होता.मात्र आ.काळे हे विखे समर्थक असल्याचे समजल्यावर खासदार नीलेश लंके यांनी ऐनवेळी बाह्या सावरून सुधीर म्हस्के यांना जेष्ठ नेते खा.शरद पवार यांचे आदेशावरून दारूगोळा पुरवला असल्याचे मानले जात आहे.परिणामी हा आ.काळे यांना धक्का मानला जात होता.आ.काळे यांचे मंत्री विखे राजकीय नेतृत्व करत असल्याने खरा रंग चढला होता.खा.लंकेंना पारनेरमध्ये मंत्री विखे यांनी राहुल शिंदे यांच्या रूपाने घेरले असल्याचे मानले जात होते.खा.लंकेंनी हे हेरल्यानंतर विखे समर्थक म्हणून,आ.काळें विरोधात उमेदवार म्हस्के यांच्या रूपात उभा केल्याची नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा झडत होती.निकालाच्या दिवशी सुधीर म्हस्के हे मात्र आ.काळेंच्या जवळपास देखील मतांच्या रूपाने आढळून आलेले दिसून आले नाहीत.
दरम्यान मतदानाच्या दिवशी काल आ.आशुतोष काळे,भाजप विधानपरिषद आ.विवेक कोल्हे,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे व चैताली काळे यांनी एकत्र येऊन मोठी खिडं लढवली असल्याचे मानले जात आहे.विशेषतः आमदार काळे यांची संपूर्ण यंत्रणा आणि कार्यकर्ते हे शंभर टक्के मतदान होण्यासाठी धावपळ करताना आढळून आले होते.विशेष म्हणजे मंत्री विखे पाटील यांचे मेहुणे तथा गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे देखील एकत्र आले असल्याचे दिसून आले असल्याचे तालुक्यात आश्चर्य मानले जात आहे.त्यामुळे ही लढाई सर्वपक्षीय बनली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे मतदारांना आगामी जिल्हा परिषदेसाठी काय ते संदेश गेला असल्याचे मानले जात आहे.दरम्यान आधीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आ.काळे यांचेवर ऐतराजी असून ती अजून वाढण्याची शक्यता वाढली असून याचे पडसाद आगामी काळात रयत शिक्षण संस्थेत उमटणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे आगामी काळ हा आ.काळे यांचेसाठी कसा असणार हा विषय औत्सुक्याचा ठरणार असल्याचे दिसून येत आहे.



