जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

जिल्हा बँक निवडणुकीत…यांनी केले मतदान !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी) 

  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण २१ जागांपैकी ११ जागेवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित १० जागांसाठी आज रोजी मतदान मोठ्या उत्साहात पार पडले असून त्यात शेती पूरक मतदार संघातून सहकार विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे तसेच त्यांच्या धर्मपत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी मतदान केले असल्याची माहिती हाती आली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील शेती पूरक मतदार संघातून सहकार विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांनी मतदान केले आहे ते छायाचित्र.

दरम्यान आज कोपरगाव निवडणूक केंद्रात आज दुपारी 04 वाजे पर्यंत अंतिम आकडेवारी हाती आली असून त्यात शेतीपूरक मतदारसंघात १७६ पैकी १७६ मतदान झाले आहे.या शिवाय सोसायटी मतदारसंघात १०९ पैकी १०८ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे तर या खेरीज बिगर शेती  मतदार संघात २४४ पैकी  २३६ मतदारांनी आपले अस्तित्व दाखवून दिले असल्याचे दिसून आले आहे.

    याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १० जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २७ जणांनी आपले नशीब आजमावले असल्याचे दिसून येत आहे.त्यांचे नशीब आज अखेर पेटीबंद झाले आहे.अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या स्पर्धेत जिल्ह्यातील आजी-माजी आमदार,खासदार,त्यांचे युवराज,साखर कारखानदार असल्याने राज्याचे निवडणुकीकडे लागले आहे.या रणांगणात होत असलेल्या १० जागांमध्ये भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे,कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची युती ८ जागा तर शरद पवार गटाचे खा.नीलेश लंके व शिंदे गटाचे माजी खा.सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल ७ जागा तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट कर्जतमधील १ जागा लढवत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदान करताना माजी संचालक चैताली काळे दिसत आहेत.

  दरम्यान आज कोपरगाव निवडणूक केंद्रात आज दुपारी 04 वाजे पर्यंत अंतिम आकडेवारी हाती आली असून त्यात शेतीपूरक मतदारसंघात १७६ पैकी १७६ मतदान झाले आहे.या शिवाय सोसायटी मतदारसंघात १०९ पैकी १०८ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे तर या खेरीज बिगर शेती  मतदार संघात २४४ पैकी  २३६ मतदारांनी आपले अस्तित्व दाखवून दिले असल्याचे दिसून आले आहे.कोपरगाव येथील मतदार केंद्रात विभागीय अधिकारी संदीपकुमार रुद्राक्ष तर केंद्राधिकारी राजेंद्र रहाणे,संदीप नेरे आदींनी आपले कर्तव्य बजावले असून ही निवडणूक शांततेत पार पडली असल्याचे सांगितले आहे.

   दरम्यान आज कोपरगाव शहरातील कोपरगाव नगरपालिकेच्या ०६ नंबर शाळेतील मतदान केंद्रावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील शेती पूरक मतदार संघातून सहकार विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे तसेच जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी मतदान केले आहे.या निवडणुकीच्या निकालाकडे आ.आशुतोष काळे समर्थकांसह कोपरगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close