जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महावितरण विभाग

कोपरगावच्या लोकप्रतिनिधींचे काळे झेंडे दाखवून स्वागत !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (नानासाहेब जवरे)

  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख आणि अंजनापूर येथील संयुक्तपणे राबवलेल्या 33 एकर योजनेचे (अशासकीय) उद्घाटन करण्यास गेलेल्या आ.आशुतोष काळे यांना आज भाजप कोल्हे गटांच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या काळे झेंडे आणि निषेधाच्या घोषणांचा आणि रोषाचा सामना करावा लागला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्याला दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला आहे.

आ.आशुतोष काळे यांना काळे झेंडे दाखवत असताना भाजप आ.कोल्हे गटाचे कार्यकर्ते दिसत आहेत.त्यांना समजावून सांगताना शिर्डी पोलिस ठाण्याचे अधिकारी दिसत आहेत.

दरम्यान आमचे प्रतिनिधीने याबाबत राहाता येथील महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाबाबत कानावर हात ठेवले असून आपण आणि आमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी कोणीही घटनास्थळी उपस्थित नव्हते असे स्पष्ट सांगितले आहे.सदर कार्यक्रम खाजगी कंपनीने यायोजित केला असल्याची माहिती दिल्याने तो अशासकीय असल्याचे उघड झाले आहे.यामुळे हा सौर प्रकल्प हा उजनी चारी आणि निळवंडे प्रकल्प ठरतो की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

    मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे.योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि भरवशाची वीज देणे.शेतीसाठी लागणाऱ्या पारंपारिक विजेचा ताण कमी करणे असा आहे.उपकेंद्रांच्या ५ ते १० किलोमीटर परिघात सौर प्रकल्प उभारले जातात.निर्माण झालेली वीज थेट कृषी वाहिन्यांद्वारे शेतकऱ्यांना मिळते.राज्यातील कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर आणण्याचे शासनाचे ध्येय असून त्या दिशेने सरकारचे काम जोरात सुरू आहे.वीज बिल थकवणाऱ्या शेतकऱ्यांचे गळ्यातील लोढणे काढून टाकायचे ठरवले आहे.त्यामुळे राज्य आणि देशभर या योजनेची वेगाने अंमलबजावणी सुरू आहे.कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख आणि अंजनापूर शिवारात अनुक्रमें 16 आणि 17 अशा एकूण 33 एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.असे असताना आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा घाट घातला होता.त्यावेळी त्यांना अंजनापूर येथून रांजणगाव देशमुखकडे जाताना अंजनापूर फाटा या ठिकाणी भाजप आ.विवेक कोल्हे गटांच्या कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.मात्र शिर्डी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने व हातातील काळे झंडे हातातून काढून घेतल्याने त्यांचा काहीसा भ्रमनिरास झाला असल्याचे दिसून आले आहे.

 रांजणगाव देशमुख येथील आ.आशुतोष काळे यांचे मार्गात अंजनापूर येथील फाट्यावर काळे झेंडे घेऊन उभे असलेले व विरोधी घोषणा देऊन निषेध व्यक्त करताना कोल्हे गटाचे कार्यकर्ते दिसत आहेत.

दरम्यान या घटनेबाबत शिर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश चव्हाण यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आ.विवेक कोल्हे यांचे प्रोटोकॉल नुसार कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने तेथील कार्यकर्ते नाराज होते.त्यामुळे त्यांनी तसा प्रयत्न केला असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.मात्र आम्ही वेळीच दखल घेऊन त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे पुढील अनर्थ टळला असल्याचे सांगितले आहे.

    त्यावेळी भाजपचे माजी युवा तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे,माजी तालुकाध्यक्ष कैलास रहाणे,प्रकाश गोर्डे,सचिन खालकर,अनिल खालकर,चीमा वर्पे,हरिभाऊ वर्पे,नानासाहेब वर्पे,अरुण वर्पे,अरुण गव्हाणे,बंडू थोरात,द्यानदेव थोरात,माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे,डी.पी,औताडे,अशोक औताडे,प्रभाकर रहाणे,कोंडाजी रहाणे,हरिदास रहाणे,गोरक्षनाथ रहाणे,विजय डांगे,अनिल शिंदे,बाबासाहेब सोनवणे,भीमराज गुंजाळ,शिवाजी रहाणे,आणि परिसरातील कोल्हे गटाचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटले होते.त्यांनी यावेळी विधानपरिषदेचे आ.विवेक कोल्हे यांना सदर कार्यक्रमास निमंत्रण दिले नाही याबाबत रोष वक्त केला असून शासकीय कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव दिसले नाही.त्यांना सन्मानाने निमंत्रण दिले नाही.असा आरोप माजी तालुकाध्यक्ष कैलास रहाणे यांनी केला आहे.त्यामुळे आम्ही हा रस्ता अडवून या घटनेचा निषेध व्यक्त केला असल्याचे घटनेस माजी तालुकाध्यक्ष कैलास रहाणे यांनी दुजोरा दिला आहे.तर अंजनापूर येथील आ.काळे गटांचे कार्यकर्ते माजी सरपंच ध्यानेश्वर गव्हाणे यांनी त्यास दुजोरा दिला आहे.

सदर उद्घाटनास सिजल इंडिया लिमिटेडचे प्रेसिडेंट अय्यालुसामी सरवणम,इन्फिसोल एनर्जी लिमिटेडचे संचालक दिपक लड्डा,देवानंद कोटगिरे,रमण लड्डा,गटविकास अधिकारी स्वप्नील वाळूंज,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष दिनार कुदळे आदी मान्यवर दिसत आहेत.

या पूर्वीही आ.आशुतोष काळे यांनी सिन्नर तालुक्यातील शहा येथील 132 के.व्ही.ए.प्रकल्पाचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते उद्घाटन करून याला जवळपास दोन वर्षाचा कालखंड उलटला आहे.तरीही ते कार्यान्वित झालेला नाही आणि शेतकऱ्यांना संपूर्ण दाबाने आजही वीज मिळत नाही.शिवाय कोपरगाव शहरासाठी पिण्याचे पाणी पुरविण्यास अहंम भूमिका निभावणाऱ्या पाच क्रमांकाच्या तलावाचे उद्घाटन करून अद्याप ते शहरातील नागरिकांना मिळालेले नाही.ते या अद्याप अपूर्ण असल्याचे माहिती काल तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.त्यामुळे अशा बेभरवशाच्या उद्घाटनांवर नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी किती भरवसा ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

    दरम्यान या रांजणगाव देशमुख आणि अंजनापूर या शेजारी गावात सिजल इंडिया कंपनी लिमिटेड या खाजगी कंपनीने या दोन्ही ठिकाणी 10 मेगा वॅट (एम.व्हि.ए.) क्षमतेचा हा प्रकल्प उभारणी केली आहे.त्यातील रांजणगाव देशमुख येथील सौर प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.तर अंजनापूर येथील प्रकल्पाचे काम अद्याप अंतिम चरणात आहे.मात्र तरीही याचे उद्घाटन करण्याची आ.काळे यांनी घाई का केली हे समजायला मार्ग नाही.मात्र त्याची किंमत त्यांना आज चुकवावी लागली असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी आज अंजनापूर येथील प्रकल्पाचे उद्घाटन करून ते रांजणगाव देशमुख येथील प्रकल्प उदघाटन करण्यास जात असताना त्यांना या रोषाचा सामना करावा लागला आहे.

रांजणगाव देशमुख आणि अंजनापूर या शेजारी गावात सिजल इंडिया कंपनी लिमिटेड या खाजगी कंपनीने या दोन्ही ठिकाणी 10 मेगा वॅट क्षमतेचा हा प्रकल्प उभारणी केली त्याची पाहणी करताना आ.काळे दिसत आहे.

   दरम्यान आमचे प्रतिनिधीने याबाबत राहाता येथील महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाबाबत कानावर हात ठेवले असून आपण आणि आमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी कोणीही घटनास्थळी उपस्थित नव्हते असे स्पष्ट सांगितले आहे.सदर कार्यक्रम खाजगी कंपनीने यायोजित केला असल्याची माहिती दिल्याने तो अशासकीय असल्याचे उघड झाले आहे.यामुळे हा सौर प्रकल्प हा उजनी चारी आणि निळवंडे प्रकल्प ठरतो की काय अशी शंका उपस्थित होत आहे.कारण या पूर्वीही आ.आशुतोष काळे यांनी सिन्नर तालुक्यातील शहा येथील 132 के.व्ही.ए.प्रकल्पाचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते उद्घाटन करून याला जवळपास दोन वर्षाचा कालखंड उलटला आहे.तरीही ते कार्यान्वित झालेला नाही आणि शेतकऱ्यांना संपूर्ण दाबाने आजही वीज मिळत नाही.शिवाय कोपरगाव शहरासाठी पिण्याचे पाणी पुरविण्यास अहंम भूमिका निभावणाऱ्या पाच क्रमांकाच्या तलावाचे उद्घाटन करून अद्याप ते शहरातील नागरिकांना मिळालेले नाही.ते या अद्याप अपूर्ण असल्याचे माहिती काल तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.त्यामुळे अशा बेभरवशाच्या उद्घाटनांवर नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी किती भरवसा ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आ.आशुतोष काळे हे अंजनापूर येथील उद्घाटन उरकून रांजणगाव देशमुख येथून आपल्या फॉर्ट्युनर जात असताना त्यांचा निषेध व्यक्त करताना आंदोलनकर्ते दिसत आहेत.

   सदर उद्घाटनास सिजल इंडिया लिमिटेडचे प्रेसिडेंट अय्यालुसामी सरवणम,इन्फिसोल एनर्जी लिमिटेडचे संचालक दिपक लड्डा,देवानंद कोटगिरे,रमण लड्डा,गटविकास अधिकारी स्वप्नील वाळूंज,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष दिनार कुदळे व संलग्न संस्थांचे पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close