जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी ज्ञान,तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याची गरज -न्या.अलमले

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


कोपरगाव (प्रतिनिधी)

  विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय निश्चित करून त्यासाठी ज्ञान,तंत्रज्ञान व चिंतनाचा योग्य वापर करण्याचे आवाहन कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या.दिपक डी.अलमले यांनी कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

 

श्री.सदगुरु गंगागिरीजी महाराज महाविद्यालयात बोलताना जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या.दिपक अलमले दिसत आहेत.

“महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्ञान,तंत्रज्ञान,वेळेचा सदुपयोग आणि संयम यांची जाणीव युवा पिढीने ठेवली,तर सामाजिक स्वास्थ्य व प्रगती साध्य होईल”- न्या.एम.पी. बिहारे,न्यायमूर्ती,कोपरगाव न्यायालय.

  कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.सदगुरु गंगागिरीजी महाराज महाविद्यालयात १२ ऑगस्ट ‘जागतिक युवा दिना’ निमित्त तालुका विधी सेवा समिती, वकील संघ,अंतर्गत तक्रार निवारण समिती, महिला मंच व ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कायदा जाणीव जागृती’ कार्यशाळेत बोलत होते.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे होते.

  सदर प्रसंगी सदर कार्यशाळेसाठी सरकारी वकील अ‍ॅड.अशोक वहाडणे,वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप लासुरे,सरकारी वकील अ‍ॅड.अशोक डी.टुपके आदीं मान्यवर उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आधुनिक तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते आणि ते भविष्यातील आव्हानांचा सामना यशस्वीपणे करू शकतात.स्पष्ट ध्येय असल्यामुळे वेळेचा अपव्यय होत नाही आणि लक्ष एकाग्र राहते.शिवाय ध्येय समोर असल्यावर कठीण प्रसंगीही काम करण्याची ऊर्जा मिळते.परिणामी त्यांचा आत्मविश्वास वाढतो,छोटे टप्पे पूर्ण केल्यावर मनातील आत्मविश्वास दृढ होतो.विद्यार्थ्यांनी आजच्या डिजिटल युगात ज्ञान मिळवण्यासाठी इंटरनेट आणि संगणकाचा सुयोग्य वापर करावा.वर्तमानात केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञान शिकून स्वतःला सक्षम बनवावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

  यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप लासुरे यांनी,“कायद्याचे ज्ञान व शिक्षण ही आजच्या काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले” असे सांगितले आहे.

  सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी,”महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना योग्य दिशा,कायद्याचे ज्ञान व संस्कार देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये ‘कायदा जाणीव जागृती कार्यशाळा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे,असे प्रतिपादित केले आहे.

   सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक तक्रार निवारण समिती व महिला मंचच्या चेअरमन प्रा.डॉ. उज्ज्वला भोर यांनी केले आहे तर कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.मयुरी देवकर व प्रा.अनिता गोरे  यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.सीमा दाभाडे यांनी मानले आहे.
           

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close