नगर जिल्हा
समृद्धी महामार्गा खालच्या निळवंडे उपचाऱ्यांना ७७ लाखांचा निधी वर्ग
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सायाळे नजीक समृद्धी महामार्गाच्या खालून निळवंडे कालव्यांच्या उपवितारीका घेण्यासाठी जलसंपदा विभागाने ७७ लाख रुपयांचा निधी समृद्धी महामार्गाकडे वर्ग केल्याची विश्वसनिय माहिती हाती आल्याने निळवंडे कालवा कृती समितीच्या प्रयत्नांना यश आले आहे.आता पुच्छ भागातील उपचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने सायाळे येथील कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करून जलसंपदा विभागाचे आभार मानले आहेत.
निळवंडे प्रकल्पाच्या उत्तरेस असलेल्या लाभक्षेत्रातील सिन्नर तालुक्यातील सायाळे ग्रामपंचायत हद्दीतून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महात्वांकांक्षी असलेला ५६ हजार कोटी रुपयांचा समृद्धी महामार्ग मंजूर झाला.हिबाब निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय शिंदे व तानाजी शिंदे सर,रामनाथ ढमाले आदींनी हि बाब कालवा कृती समितीच्या लक्षात आणून दिली.या प्रकल्पामुळे सायाळे,मळढोण,पाथरे,दुशिंगपूर नजीक या कालव्यांच्या उपचाऱ्या बाधित होत होत्या त्यामुळे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले व अन्य पदाधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत समृद्धी महामार्ग नाशिक कार्यालय व जलसंपदाचे संगमनेर येथील विभागीय कार्यालयासह वरिष्ठ कार्यालयांच्या हि बाब २५ जून २०१९ लेखी निवेदन देऊन लक्षात आणून दिली होती.
निळवंडे धरण मंजूर होऊन आता या जुलै महिन्यात ५० वर्ष पूर्ण होत आहेत.मात्र तरीही अद्याप या प्रकल्पाचे काम दुर्दैवाने पूर्ण झालेले नाही.अनेक राजकीय रथी-महारथींनीं आपणच निळवंडेचे काम पूर्ण केल्याचा दावा केला होता.१४ जुलै १९७० रोजी या प्रकल्पाची मंजूरीं ७.९३ कोटी रुपयांची होती आता या प्रकल्पाची किंमत २२३२.६२ कोटींवर पोहचलेली आहे.मात्र अद्याप हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही.याच्या कालव्यांचे बहुतांशी काम अपूर्णच आहे.निळवंडे कालवा कृती समितीने या बाबत केंद्रीय जल आयोगापासून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठात अड्.अजित काळे यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल करून या प्रकल्पाच्या सतरा मान्यता मिळवल्या व या प्रकल्पाला सरकारकडून निधीची मंजुरी मिळवली व आर्थिक तरतूद करण्यास भाग पाडले.आता उच्च न्यायालयाच्या आदेशाने काम वेगाने सुरु झालेले आहे.आता कोरोना साथीमुळे काम मंदावलेले आहे.मात्र तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या उत्तरेस असलेल्या लाभक्षेत्रातील सिन्नर तालुक्यातील सायाळे ग्रामपंचायत हद्दीतून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महात्वांकांक्षी असलेला ५६ हजार कोटी रुपयांचा समृद्धी महामार्ग मंजूर झाला.हिबाब निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय शिंदे व तानाजी शिंदे सर,रामनाथ ढमाले आदींनी हि बाब कालवा कृती समितीच्या लक्षात आणून दिली.या प्रकल्पामुळे सायाळे,मळढोण,पाथरे,दुशिंगपूर नजीक या कालव्यांच्या उपचाऱ्या बाधित होत होत्या त्यामुळे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले व अन्य पदाधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत समृद्धी महामार्ग नाशिक कार्यालय व जलसंपदाचे संगमनेर येथील विभागीय कार्यालयासह वरिष्ठ कार्यालयांच्या हि बाब २५ जून २०१९ लेखी निवेदन देऊन लक्षात आणून दिली होती.
त्या बाबत निधीची तरतूद करून या उपचाऱ्या समृद्धी प्रकल्पाचे काम सुरु असतानाच जमिनीखालून कराव्या अशी मागणी केली होती.त्या बाबत जलसंपदा विभागाने हे काम करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.आता या उपचाऱ्यांचे काम करण्यासाठी जलसंपदा विभागाने समृद्धी महामार्गाकडे नुकताच ७७ लाख रुपयांचा निधी वर्ग केला आहे.त्यामुळे निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,संघटक नानासाहेब गाढवे,गंगाधर रहाणे,रमेश दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे,कौसर सय्यद,सचिव कैलास गव्हाणे,संदेश देशमुख,ज्ञानदेव शिंदे,डॉ.संदीप ढमाले,विठ्ठलराव देशमुख,विठ्ठलराव पोकळे,नामदेवराव दिघे,अशोक गांडूळे,संतोष गाढे,बाबासाहेब गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,वामनराव शिंदे,तानाजी शिंदे,आप्पासाहेब कोल्हे,दौलत दिघे,रावसाहेब मासाळ,दत्तात्रय थोरात,गोरक्षनाथ शिंदे,जनार्दन लांडगे आदींसह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनीं जलसंपदा विभागाचे आभार मानले आहेत.