जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात मुंबई,पुण्यातून नागरिकांचा ओघ वाढला !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोनाने आपला मुंबई -पुण्यात विळखा घट्ट करण्यास प्रारंभ केल्याने अनेक धास्तावलेले नागरिक आता आपला मोर्चा ग्रामीण भागात वळवू लागले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.याची माहिती प्रशासनाकडे पोहचविण्याची जबाबदारी आता प्रशासनाबरोबर नागरिकांनाही घ्यावी लागणार आहे.तरच हे संकट दूर होऊ शकेल.

देश पातळीवर कोरोनाचा हा आलेख उतरता भासत असला तरी मुंबई,पुणे.ठाणे,मालेगाव आदी ठिकाणी मात्र हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.त्यामुळे आता या महानगरातील नागरिक आता रात्रीच्या सुमारास शहराकडून आता ग्रामीण भागात पळ काढताना दिसत आहे.कोपरगाव तालुक्यात या आधीच दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.दरम्यान संवत्सर येथील आलेल्या महिलेची माहिती तालुका प्रशासनाकडे पोहचली असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या २२९ ने वाढून ती २९ हजार ६८७ इतकी झाली असून ९४० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ८ हजार ५९० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ३६९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ४२ वर जाऊन पोहचली आहे तर चौघाचा मृत्यू झाला आहे.आता देश पातळीवर हा आलेख उतरता भासत असला तरी मुंबई,पुणे.ठाणे,मालेगाव आदी ठिकाणी मात्र हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.त्यामुळे आता या महानगरातील नागरिक आता रात्रीच्या सुमारास शहराकडून आता ग्रामीण भागात पळ काढताना दिसत आहे.कोपरगाव तालुक्यात या आधीच दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.

दरम्यान गांधीनगर परिसरात काही तरुण सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान घोळक्या-घोळक्याने बसलेले आढळून येत असून या उडानटप्पू पासून या भागातील नागरिकांना धोका पोहचू शकत असल्याची माहिती काही जेष्ठ नागरिकांनी आमच्या प्रातिनिधीस दिली असून त्यांचा शहर पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असे बरेच रुग्ण रात्री अपरात्री आल्याची माहिती आहे.विशेषतः बाजार समितीच्या नैऋत्येस दोन दिवसांपूर्वी एका इसमाने आपले कुटुंब रात्रीच सोडून पोबारा केल्याची माहिती आहे.तर दुसरी घटना हि संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत लक्ष्मणवाडीत आज पहाटेच्या सुमारास एका पतीने आपल्या पत्नीसह कुटुंबाला सोडून देऊन पोबारा केल्याची माहिती आहे.त्या मुळे सोडून दिलेल्या महिलेच्या माहेरच्या कुटुंबासोबत मजुरीने काम करणाऱ्या अन्य महिलांनी अघोषित बहिष्कार टाकल्याची माहिती आहे.या बाबत प्रशासने खबरदारी घेणे गरजेचे आहे.सध्या संगमनेर,येवला,मालेगाव आदी लाल फितीतील शहरे आपल्या नजीकच असल्याने हि भीती आणखी वाढली आहे.शिर्डी नजीक काल पोलिसांना संगमनेर येथून आलेले काही नागरिक आढळले असून त्यांच्या विरोधात शिर्डी पोलिसांनी दक्ष रहात गुन्हा दाखल केल्याने समाधान व्यक्त होत आहे.हीच सावधानता कोपरगाव शहर प्रशासन व तालुका प्रशासनास घ्यावी लागणार आहे.अन्यथा एवढ्या प्रयत्नांवर पाणी फिरण्यास वेळ लागणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close