जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वर्धापन दिन विशेष

…या पालिकेचे दोन धाडसी निर्णय,अंमलबजावणी सुरू!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)  

  कोपरगाव शहरांमधील अनधिकृत बॅनरबाजी,फ्लेक्स आणि पोस्टरमुळे सार्वजनिक ठिकाणांचे विद्रूपीकरण होत असून वाहतुकीला अडथळा आणि दुर्घटनांचा धोका निर्माण झाल्यामुळे ही एक अत्यंत चिंताजनक व गंभीर समस्या बनली असताना याबाबत कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष पराग संधान यांनी कठोर भूमिका घेऊन अनधिकृत फ्लेक्स आणि एकल वापराचे प्लास्टिक वर निर्बंध आणले असल्याचे त्यांचे या क्रांतिकारक निर्णयाबाबत नागरिकांत कौतुक होत आहे.

 

“आम्ही बॅनर लावण्यासाठी शहरात ३० ठिकाणे निश्चित केली आहे.त्या व्यतिरिक्त कोठेही कोणालाही बॅनर लावता येणार नाही.बॅनरचा आकार १२’/१५’ फूट असा आकार निश्चित केला असून त्या निश्चित केलेल्या ठिकाणी सुद्धा बॅनरवर प्रिंटर,प्रकाशकाचे नाव,नगरपरिषदेची पावती लावणे बंधनकारक केले आहे.त्यात सदर बॅनरची मुदत निश्चित केली जाणार आहे.यात दहावा,अंत्यविधी,श्रद्धांजली बॅनरवर मानवीय दृष्ट्या कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.मात्र सदर बॅनरचे दर रुपये ०५ प्रति चौरस फूट प्रतिदिन असे निश्चित करण्यात आले आहे”-पराग संधान,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

  कोपरगावसह कोणत्याही शहरात अनधिकृत फ्लेक्समुळे विद्रूपीकरण होत असून चौकाचौकांत,भिंतींवर आणि खांबांवर विनापरवाना लावलेले राजकीय व जाहिरातींचे बॅनर्स शहराचे सौंदर्य बिघडवतात.या शिवाय वाहतूक सुरक्षा धोक्यात येत असून रहदारीचे फलक आणि सूचना झाकल्या गेल्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होते व अपघातांचा धोका वाढत असल्याचे निरीक्षण आहे.स्थानिक नगरपालिका आणि न्यायालयाचे स्पष्ट नियम असतानाही राजकीय वरदहस्तामुळे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही हे मोठे दुखणे बनले आहे.संबंधित बॅनर्स फाटल्यानंतर ते रस्त्यावर पडतात,ज्यामुळे कचरा व अस्वच्छता पसरते.यावर कठोर उपाययोजनांची आवश्यकता असून कायदेशीर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.विनापरवाना बॅनर्स लावणाऱ्या राजकीय व्यक्ती,मंडळे आणि कार्यकर्त्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे.त्यासाठी प्रशासन व पोलिसांचे सहकार्य अपेक्षित बनले आहे.नगरपालिकेच्या परवाना विभागांमार्फत नियमित मोहिमा राबवून बेकायदेशीर होर्डिंग्ज तात्काळ हटवले पाहिजेत.त्याऐवजी कागदी किंवा प्लास्टिक फ्लेक्सऐवजी डिजिटल माध्यमातून संदेश किंवा जाहिरातींचा पर्याय वापरण्यास प्रोत्साहन द्यावे असे आवाहन नगराध्यक्ष पराग संधान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.

 

“कोपरगाव शहरातीलप्लास्टिकच्या भस्मासुरास आ आवरण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने पावले उचलले असून दि.०१ जून २०२६ पासून त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे.त्यातून कोपरगाव शहरातील प्लास्टिक वापरास प्रतिबंध घातले आहेत.त्यात एकल वापर (सिंगल यूज) त्यात पत्रावळी,द्रोण,कागदी पेले आदींचा समावेश आहे.यासाठी जनजागृती हा महत्वाचा घटक ठरणार आहे हे उघड आहे.त्यामुळे पर्यावरण रक्षणास मदत होणार आहे”-पराग संधान,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

  शहरात कुठेही होर्डिंग उभारताना किंवा मोठ-मोठे बॅनर (फ्लेक्स) उभारताना, पालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून मान्यता घेणे आवश्यक असते मात्र,याकडे जनसामान्य किंवा तरुण पिढीकडून पूर्णतः काणाडोळा केला जात असून,राजकीय वरदहस्तामुळे पक्षाचे पदाधिकारी,विविध संस्थांकडून शहराच्या चौकाचौकांत फ्लेक्स,बॅनर आणि होर्डिंगच्या माध्यमातून सातत्याने अनधिकृत जाहिरातबाजी केली जात आहे.बऱ्याच वेळा या ‘फ्लेक्स’च्या महापुरात काही गुन्हेगारही आपले हात धुवून घेताना दिसत आहेत.स्वतःला पवित्र करताना दुर्दैवाने दिसून येत आहे.परंतु,याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे हेच बॅनर,फ्लेक्स,होर्डिंग शहराच्या विद्रूपीकरणास मोठ्या प्रमाणात खतपाणी घालत आहेत.बऱ्याच वेळा पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जाहिरातबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पालिकेच्या पक्ष नेत्यांच्या बैठकीत करण्यात आली पण सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होणारी ही बॅनरबाजी रोखणार कशी,कारवाईला गेले तर दादा,आण्णा,काका,भाऊ यांचे येणारे फोनच प्रशासनाला रोखतात त्यामुळे या राजकीय बॅनरबाजीची जबाबदारी कोणी स्वीकारायची हा प्रश्न वारंवार उभा राहात आला आहे.परिणामी बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना,” सर्वसाधारण सभेत पाहून घेऊ”च्या धमक्या येताना दिसतात.पण यापूर्वी सन-२०१६ ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत या धमक्यांना न जुमानता तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी ही अनधिकृत फ्लेक्सबाजी मोडीत काढण्याचे धारिष्ट्य दाखवले होते हे विशेष! त्यांनी आपल्या काळात ते यशस्वी करून दाखवले होते.त्यांनी स्वतःही कधी या फ्लेक्सबाजीचा आश्रय घेऊन जाहिरातबाजी केली नाही.”आधी केले मग सांगितले…” असे कोणी पदाधिकारी वागत असेल तर त्याचे अनुकरण त्यांचे कार्यकर्ते करतात असे आढळून आले आहे.मात्र बऱ्याच वेळा या तत्वाला मूठमाती देण्याचे काम पदाधिकारी करताना आढळून येतात.मग बाकी खालच्या फळीतील कार्यकर्ते आणि त्यांचे पित्ते यांना चेव यायला वेळ लागत नाही.विविध संघटना,सामाजिक मंडळे आणि त्यांच्या या कार्यकर्त्यांनी हा अनाठायी खर्च करण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज आदींचे अर्थशास्त्र,युद्धनीती,राजनीती,शेतीविषयी धोरणांबाबत तज्ज्ञांचे व्याख्यानसत्र ठेवावे. यामुळे नव्या पिढीसमोर आदर्श उभा राहील, असे आवाहन त्यांनी शेवटी संधान यांनी केले आहे.याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  दरम्यान त्यांनी याबाबतची अधिकची माहिती देताना सांगितले की,”आम्ही बॅनर लावण्यासाठी शहरात ३० ठिकाणे निश्चित केली आहे.त्या व्यतिरिक्त कोठेही कोणालाही बॅनर लावता येणार नाही.बॅनरचा आकार १२’/१५’ फूट असा आकार निश्चित केला असून त्या निश्चित केलेल्या ठिकाणी सुद्धा बॅनरवर प्रिंटर,प्रकाशकाचे नाव,नगरपरिषदेची पावती लावणे बंधनकारक केले आहे.त्यात सदर बॅनरची मुदत निश्चित केली जाणार आहे.यात दहावा,अंत्यविधी,श्रद्धांजली बॅनरवर मानवीय दृष्ट्या कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.मात्र सदर बॅनरचे दर रुपये ०५ प्रति चौरस फूट प्रतिदिन असे निश्चित करण्यात आले आहे.त्यात नेते,त्यांचे वाढदिवस,त्यांचे फोटो आणि तत्संबंधी मजकूर समाविष्ट आहे.

पराग संधान,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

            प्लॅस्टिकचा भस्मासुर आवरणार …!
 

  दरम्यान नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रांमध्ये वाढणारा प्लॅस्टिकचा कचरा हा नागरी व पर्यावरणीय आरोग्यासाठी अत्यंत चिंताजनक विषय बनला आहे.वाढत्या शहरीकरणामुळे रोजगाराची व खाण्याच्या सवयींची साधन बदलल्याने एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन करणे हा वर्तमानात कळीचा मुद्दा ठरला आहे.थप्पी लागलेला प्लॅस्टिकचा कचरा वेळेवर गोळा न होणे आणि ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण न होणे या वर्तमानात गंभीर समस्या बनल्या आहेत.रस्ते व गटारांमध्ये टाकलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पाणी तुंबणे आणि पावसाळ्यात शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे.याबाबत नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची सवय ही अडचणीची आणि घातक ठरत आहे.मुंबईत हाच कचरा पुरात जीवघेणा ठरला असल्याचे अनेकाना स्मरत असेल.नागरिक बऱ्याच वेळा प्रशासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना आढळून येत आहे.प्रशासनाने याबाबत कडक कारवाई करणे अभिप्रेत आहे.बऱ्याच वेळा प्रशासनाची कागदावर बंदी असली तरी प्रत्यक्षात दुकाने,हॉटेल,भाजीपाला विक्रेते आणि उत्पादकांवर कठोर सातत्यपूर्ण कारवाईचा अभाव दिसून येतो ही चिंताजनक बाब आहे.मात्र त्यांनी याबाबत कडक पावले उचलली आहे ही समाधानाची बाब आहे.परिणामी दुष्परिणामपर्यावरणाचा नाश होत असून हे प्लॅस्टिक शेकडो वर्षे नष्ट होत नाही,ज्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते व भूजल पातळीवर परिणाम होतो.प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.मोकाट जनावरे अन्नासोबत प्लॅस्टिक खात असल्याने त्यांचा जीव धोक्यात येतो.त्यातून आरोग्य समस्या निर्माण होत असून कचरा विल्हेवाट लावण्यासाठी तो जाळल्यास निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे श्वसनाचे गंभीर आजार बळावतात असे तज्ञांना आढळून आले आहे.एवढेच नाही तर नव अर्भकाच्या पोटात आणि रक्तात प्लास्टिकचे अंश आढळून येत आहे.समुद्रात माशांच्या विविध प्रजातीच्या पोटातही प्लास्टिक आढळून येत असल्याचे ही समस्या जागतिक म्हणून पुढे आली असल्याचे आढळून येत आहे.यावरून प्लास्टिकची समस्या किती विश्वव्यापी बनली आहे याचा कोणाही विचारी माणसास सहज अंदाज येईल.

  दरम्यान या प्लास्टिकच्या भस्मासुरास आ आवरण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने पावले उचलले असून दि.०१ जून २०२६ पासून त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे.त्यातून कोपरगाव शहरातील प्लास्टिक वापरास प्रतिबंध घातले आहेत.त्यात एकल वापर (सिंगल यूज) त्यात पत्रावळी,द्रोण,कागदी पेले आदींचा समावेश आहे.यासाठी जनजागृती हा महत्वाचा घटक ठरणार आहे हे उघड आहे.त्यामुळे पर्यावरण रक्षणास मदत होणार असल्याचा दावा नगराध्यक्ष पराग संधान यांनी शेवटी केला आहे.या सर्व कार्यासाठी आम्हाला माजी आ.स्नेहलता कोल्हे, आ.विवेक कोल्हे,सर्व नगरसेवक प्रशासन आदींचे सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यास ते विसरले नाही.आता आगामी काळात या क्रांतिकारक निर्णयाला व्यापारी,नागरिक कसा प्रतिसाद देतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close