निवड
न्यायाधीश आणि वकील एकाच गाडीचे दोन चाके -…या न्यायमूर्तींचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
न्याय व्यवस्थेतील न्यायाधीश आणि खटले चालवणारे वकील हे एकाच गाडीचे दोन चाके असून रस्त्यातील खड्डे वाचवून गाडी चालवली आणि त्यांचा समतोल साधला असेल तरच कोणतेही कार्य यशस्वीपणे पार पडेल;गाडीचे चाक रस्त्यात रुतू देता कामा नये असा मौलिक सल्ला कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या.दिपक आलमले यांनी आज दुपारी एका कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना दिला आहे.

दरम्यान वकील संघाचे नूतन अध्यक्ष ॲड.दिलीप लासुरे यांनी “आपण आपल्या कार्यकाळात न्यायालयाची 38 कोटींची इमारत संबंधिताना भेटून लवकरच पूर्ण करण्याबरोबरच आपल्या सहकाऱ्यांशी एकोप्याने काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.आपल्या निवडीने जर प्रस्थापितांना,”मिरची लगी तो मैं क्या करू” या ‘कुली नंबर १’या १९९५ मध्ये आलेल्या लोकप्रिय हिंदी चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या गाण्याच्या ओळीचा उल्लेख केला त्यावेळी उपस्थितांत मोठा हशा पिकला असल्याचे दिसून आले आहे.
कोपरगाव वकील संघाच्या आज मोठया उत्साहात संपन्न झालेल्या निवडणुकीत ॲड.दिलीप चिंतामणी लासुरे हे 204 पैकी 96 मते घेऊन विजयी झाले त्यांचा वकील संघाच्या वतीने नुकताच सरकार करण्यात आला असून आज पदग्रहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

“नवीन अध्यक्ष जरी जहाल मतवादी असले तरी ते त्यांच्या काळात पारदर्शी आणि दूरगामी विचार करून कारभार करतील आणि नव्याने सुरू असलेल्या 38 कोटींच्या इमारतीचे कामाचा पाठपुरावा करून ते लवकरच मार्गी लावतील”-ॲड.जयंत जोशी,माजी अध्यक्ष,कोपरगाव वकील संघ.
सदर प्रसंगी कोपरगाव येथील दिवाणी (वरिष्ठ स्तर) न्या.महिपाल बिहारे,अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री.खैरनार,न्या.जान्हवी केळकर,दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्या.तांबोळी,सहकार न्यायाधीश न्या.दांडगे आदी सह वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.जयंत जोशी,एस.एम.वाघ,ॲड.अशोकराव वहाडणे,ॲड.शरद गुजर,शिरीषकुमार लोहकने,ॲड.मच्छिंद्र खिलारी,अशोक टूपकें, ॲड.योगेश खालकर आदींसह नवीन पदाधिकारी आणि वकील संघाचे बहुसंख्य वकील उपस्थित होते.

“नूतन अध्यक्ष हे स्वभावाने तापट असले तरी त्यांच्या स्वभावात पारदर्शकता आणि प्रामाणिकता आहे.या संस्कारात ते अजिबात कमी पडणार नाही.ते आगामी काळात माजी खा.स्व.भीमराव बडदे यांचा वारसा चालवतील आणि राजकारणात मोठे परिवर्तन घडवून आणतील”-ॲड.मच्छिंद्र खिलारी,माजी अध्यक्ष,कोपरगाव वकील संघ.
दरम्यान वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.अशोक टुपके यांनी संत ज्ञानेश्वर रचित ग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’चा आधार घेत आपल्या अल्पशब्दात वकील संघ,”जो जे वांछील ते ते लाभो ” अशी कोटी करून कमी शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान कोपरगाव वकील संघाचे नूतन अध्यक्ष ॲड.दिलीप लासूरे यांनी,”आपण आपल्या कार्यकाळात न्यायालयाची 38 कोटींची इमारत संबंधित अधिकारी आणि ठेकेदार आदींना भेटून पाठपुरावा करून लवकरच पूर्ण करणार आहे.आपल्या सहकाऱ्यांशी एकोप्याने काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.आपल्या निवडीने जर प्रस्थापितांना,”मिरची लगी तो मैं क्या करू” या ‘कुली नंबर १’या १९९५ मध्ये आलेल्या लोकप्रिय हिंदी चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या गाण्याच्या ओळीचा उल्लेख केला त्यावेळी उपस्थितांत मोठा हशा पिकला असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान कोपरगाव वकील संघाचे नूतन अध्यक्ष ॲड.दिलीप लासूरे यांनी,”आपण आपल्या कार्यकाळात न्यायालयाची 38 कोटींची इमारत संबंधित अधिकारी आणि ठेकेदार आदींना भेटून पाठपुरावा करून लवकरच पूर्ण करणार आहे.आपल्या सहकाऱ्यांशी एकोप्याने काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.आपल्या निवडीने जर प्रस्थापितांना,”मिरची लगी तो मैं क्या करू” या ‘कुली नंबर १’या १९९५ मध्ये आलेल्या लोकप्रिय हिंदी चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या गाण्याच्या ओळीचा उल्लेख केला त्यावेळी उपस्थितांत मोठा हशा पिकला असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान कोपरगाव वकील संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या या निवडणुकीत विजयी झालेले परिवर्तनवादी चळवळीत सहभागी असलेले वकील ॲड.दिलीप लासुरे हे विजयी झाले आहे.या निवडणुकीत त्यांच्या विजयाचे वेगळे मोल कोपरगाव तालुक्यात मानले जात आहे.ही निवडणूक ही बुद्धिवादी माणसांची समजली जात असून येथून तालुक्याच्या परिवर्तनाची सुरुवात होत असल्याचे मानले जात आहे.अलीकडील काळात वकील संघात काळे कोल्हे असे गट पडले आहे हे कोणीही नाकारणार नाही त्याचे पडसाद निवडणुकीत प्रारंभी दिसून आले आहे.त्यांनी ॲड.लासुरे यांचे पासून चार हात दूर राहणे पसंत केले असल्याचे मानले जात आहे.मात्र आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात तसे दिसून आले नाही.
यावेळी प्रास्ताविक मावळते अध्यक्ष ॲड.शरद गुजर यांनी केले तर सूत्रसंचालन मावळते उपाध्यक्ष ॲड.महेश भिडे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार नूतन उपाध्यक्ष ॲड.निलेश कातकडे यांनी मानले आहे.
कोपरगाव वकिल संघाची उज्ज्वल राजकीय परंपरा
दरम्यान यापूर्वी सन-1995 साली वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.स्व.भीमराव बडदे यांची निवड झाली होती.त्यानंतर त्यांनी आलेल्या लोकसभा निवडणुकीत बाजी मारली होती.व थेट दिल्ली गाठली होती.तत्कालीन काँग्रेस नेते माजी मंत्री शंकरराव काळे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला होता.त्यानंतर वकील संघाचे अध्यक्षपद भूषवत ॲड.नानासाहेब चांदगुडे यांनी तत्कालीन मंत्री शंकरराव कोल्हे यांचे कार्यकाळात कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सन-1988 ते 1998 अशी दहा वर्षे अध्यक्षपद भूषवले होते.याशिवाय वकील संघाचे माजी अध्यक्ष असलेले ॲड.मच्छिंद्र खिल्लारी यांनी माजी खा.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे कार्यकाळात माजी प्रदेशाध्यक्ष असताना भाजपचे तालुकाध्यक्ष पद सांभाळून कोपरगाव सहकारी साखर कारखान्यात दहा वर्षे संचालकपद भूषवले होते.ॲड.आर.जी.चीने यांनी माजी मंत्री कोल्हे यांचे कार्यकाळात संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे वीस वर्षे तर गोदावरी सहकारी दूध संघाचे अनेक वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते.(पुढे त्यांनी राज्यात 1997 साली गाजलेल्या कोल्हे-परजणे वादात नामदेवराव परजणे यांची बाजू घेतली होती) तर ॲड.साहेबराव खालकर यांनीही आपल्या कार्यकाळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद भूषवले होते.या शिवाय ॲड.अशोक टूपके यांनी अध्यक्षपद सांभाळल्यानंतर देवयानी सहकारी बँक व संजीवनी सहकारी बँकेचे तर ॲड.शिरीष कुमार लोहकने यांनी गौतम सहकारी बँकेचे संचालकपद भूषवले होते.या शिवाय ॲड.शंकरराव आढाव यांनी अध्यक्षपद भूषवल्यावर अनेक वर्षे कोपरगाव सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्षपद भूषवले आहे.आजही ही संस्था त्यांचे ताब्यात असल्याची मानली जात आहे.त्यामुळे आता ॲड.दिलीप लासुरे यांच्या भाळी कोणते पद लिहिलेले आहे हे आगामी काळात उघड होणार आहे.त्यासाठी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.मात्र ते रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेत सामील होतील व मोठे पद भूषवातील असा कयास लावला जात आहे.वर्तमानात कोपरगाव तालुक्यात विरोधी बाकावर मोठी राजकीय पोकळी तयार झाली असून ती ते भरून काढतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.



