कोपरगाव तालुका
कोपरगावात सोमवार या मालाचे लिलाव होणार सुरु
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दि.सोमवार २७ एप्रिल पासून भुसार मालाचे लिलाव लिलाव सोमवार, बुधवार, शुक्रवार या तीन दिवशी सुरु होणार असल्याची माहिती कोपरगाव बाजार समितीचे सभापती सभांजी रक्ताटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
सरकारने स्वाभाविकपणे कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव बाजार समितीचे लिलाव टाळेबंदी सरकारने जाहीर केल्यानंतर बंद केले होते.त्यामुळे तालुक्यातील व नजीकच्या तालुक्यातही शेतकऱ्यांचे शेतमाल विक्रीची इच्छा असतानाही आपला शेतमाल विकता येत नव्हता.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १८७ ने वाढून ती २३ हजार २२६ इतकी झाली असून ७२५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ६ हजार ४२७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २८३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ३२ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव बाजार समितीचे लिलाव टाळेबंदी सरकारने जाहीर केल्यानंतर बंद केले होते.त्यामुळे तालुक्यातील व नजीकच्या तालुक्यातही शेतकऱ्यांचे शेतमाल विक्रीची इच्छा असतानाही आपला शेतमाल विकता येत नव्हता.त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या दैनंदिन आर्थिक अडचणी सोडविणे जिकरीचे बनले होते.आता कोपरगाव बाजार समितीचे लिलाव पूर्ववत सुरु होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान कांदा लिलावही मंगळवार, गुरूवार, शनिवार या दिवशी सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात वाहन व विक्री शेतीमाल याची नोंदणी करुन नोंदणीच्या वेळीच विक्रीचा दिनांक दिलेले टोकण घेऊन जावे व दिलेल्या तारखेस सकाळी ११ वाजेच्या आत शेतमाल वार निहाय विक्रीस आणावे. नंतर आणल्यास लिलाव केले जाणार नाही व त्याची पुन्हा नोंद करून नंबर प्रमाणे व पुढील वारानुसार विक्री करावी लागेल. वाहनधारक व शेतकरी यांनी तोंडास मास्क,रुमाल,उपरणे बांधलेले असेल तरच फाटकातून वाहन आत सोडले जाणार आहे.तसेच एक दिवसात भुसार मालाचे १०० व कांद्याच्या १५० वाहनांचाच लिलाव करण्यात येणार आहे.बाकी अति शर्ती याची शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधून जाणून घ्याव्यात असे आवाहन उपसभापती राजेंद्र निकोले यांनी शेवटी केले आहे.