जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिवरायांचे विचार आचरण्यात आणण्याची गरज -वसंत कवाद

कोहकडीत विविध कार्यक्रमांनी शिवजयंती महोत्सव ऊत्साहात

जाहिरात-9423439946

निघोज-( प्रतिनिधी)- सामान्य जनतेला आज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.मात्र शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील समस्यांवर मात करण्यासाठी शिवरायांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज असुन शिवरायांचे विचारच आज समाजाला दिशा देतील असा विश्वास निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद यांनी व्यक्त केला.
कोहकडी (ता.पारनेर)येथील राजे छत्रपती प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सवतात ते बोलत होते यावेळी सरपंच डाँ. साहेबराव पाणगे, नारायण चौधरी,सेवा सोसायटीचे अध्यक्ष किसनराव पवार,शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष गोकुळ कळमकर, सतोष शेळके, रामभाऊ शेळके, संदिप रसाळ,कारभारी बाबर,राजेंद्र गोगडे, संभाजी टोणगे, सामाजिक कार्यकर्ते शंकर थोरात,संजय झरेकर, खंडु टोणगे, प्रशांत ढवण,सतिश गुगळे,मिना ताई जासुद आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार गोकुळ कळमकर यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजित सास्कतिक कार्यक्रमात निघोज येथील कलाअविष्कार डान्स अँकाडमी निघोज व जिल्हा परिषद शाळा कोहकडीच्या विद्यार्थ्यांनी कला सादर केली. या विद्यार्थांना कलाअविष्कार अँकाडमीचे संचालक कानिफनाथ फुलमाळी व मच्छिंद्र बोदगे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रास्ताविक गोरख टोणगे यांनी केले.तर सुत्रसंचालन सतीष गुगळे यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close