जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील ब्राह्मण सभेच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी ही भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात विविधी कार्यक्रमांनी पार पडला आहे.
यावेळी शहरात सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले.या मध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  

दरम्यान या शोभायात्रेत समाजबांधव सुनिल गोखले यांनी भगवान परशुराम यांची सादर केलेली वेशभूषा लक्ष वेधून गेली आहे.ग्रामदैवत रेणुका माता देवीच्या मंदीरा मध्ये विनित वाडेकर यांच्या हस्ते रेणुका मातेची व भगवान परशूरामाची आरती करण्यात आली आहे.

  भगवान परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार,चिरंजीवी आणि भृगु कुळातील ऋषी जमदग्नी व माता रेणुका यांचे पुत्र होते.वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीया) जन्मलेले, ‘राम’ नावाचे परशुराम शिवाचे परम भक्त होते,ज्यांनी अन्यायी क्षत्रियांपासून पृथ्वीमुक्त करण्यासाठी २१ वेळा लढा दिला.शिवाकडून मिळालेल्या ‘परशु’मुळे (कुऱ्हाड) ते परशुराम म्हणून प्रसिद्ध झाले होते.हे हिंदू धर्मातील पालनकर्ता देव विष्णूच्या दशावतारांपैकी सहावे अवतार मानले जातात.ते या ग्रहावरील दुष्टतेचा नाश करणारे आहे.शिवाने त्यांना जाऊन पृथ्वीमातेला गुन्हेगार,वाईट वर्तन करणारे लोक,अतिरेकी,राक्षस आणि गर्विष्ठ लोकांपासून मुक्त करण्याचा सल्ला दिला.ते चिरंजीवी (अमर) पैकी एक मानले जातात.त्यांची जयंती कोपरगाव येथील ब्राम्हणसभेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शोभायात्रेचे सुरुवातीला भगवान परशुरामाचे विधिवत पुजन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे शुभहस्ते झाले त्यावेळी नगराध्यक्ष विवेक कोल्हे आदी दिसत आहे.

  सदर प्रसंगी वकील माजी संघाचे अध्यक्ष जयंत जोशी,ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर,शैलैंद्र कुलकर्णी,अजित कुलकर्णी,सुनिल गोखले,ललित ठोंबरे,अतुल शालीग्राम,प्रशांत जोशी ज्ञानेश्वर कुलकर्णी यांचे हस्ते भगवान परशूरामाचे पादयपुजन महापुजा विधीवत करण्यात आली आहे.

   दरम्यान यावेळी सायंकाळी शोभायात्रेचे सुरुवातीला भगवान परशुरामाचे विधिवत पुजन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे शुभहस्ते झाले आहे.तर यावेळी नगराध्यक्ष पराग संधान,बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक,गटनेते प्रसाद आढाव,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,ऐश्वर्या सातभाई,राजेंद्र सोनवणे,नगरसेवक स्वप्नील मंजुळ,कलविंदर डडीयाल,अनिल आव्हाड,अतुल काले,डॉ.अमोल अजमेरे,विक्रमादित्य सातभाई,योगेश बागुल,संतोष शिंदे,रवींद्र कथले,वैभव गिरमे,सोमनाथ म्हस्के, सनी वाघ,संतोष गंगवाल,पप्पु पडीयार,राष्ट्रवादी कांँग्रेस पार्टीचे संदीप वर्प,विनायक गायकवाड,सुशांत घोडके,विजय जोशी,मनोज जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

   सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंतराव ठोंबरे,डाॕ.मिलींद धारणगांवकर,अजिंक्य पदे,गौरीश लव्हरीकर,योगेश कुलकर्णी,सदाशिव धारणगांवकर,वंदना चिकटे आदि पदाधिकारी समाज बांधव यांनी प्रयत्न केले आहे.

  यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी केले तर स्वागत ब्राह्यण सभेचे सचिव सचिन महाजन यांनी केले तर कार्यक्रमाचे पौरोहीत्य वेदशात्र संपन्न वैभव जोशी व त्यांच्या सहकारी यांनी केले तर सभेचे उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close