जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

भोंदू खरातचा व्हिडिओ प्रसार भोवला,तिघांवर गुन्हा!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   देश आणि राज्यात आपल्या कुकर्माने गाजत असलेला मिरगाव,कहांडळवाडी येथील भोंदूबाबा लक्ष्मण तथा अशोक खरात यांचे महिलांशी संबंधित सामाजिक तत्वांना छेद देणारे व्हिडिओ प्रसारित केल्या प्रकरणी कोपरगावातील राहुल गंगाधर शिंदे,योगेश पंढरीनाथ आढाव यांसेसह माजलगाव येथील संदीप गर्जे अशा तिघांवर कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली असून रिकामटेकड्यांना यामुळे चाप बसण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

भोंदूबाबा लक्षण तथा अशोक खरात.

सदर गुन्हयातील पिडीत महिलांचे अश्लील व्हिडीओ सामाजिक संकेत स्थळावर प्रसारीत होत असले बाबतची माहीती मिळाल्याने पोलीसांनी आरोपी आरोपी राहुल गंगाधर शिंदे,मोहिनीराज येथील आरोपी योगेश पढरीनाथ आढाव यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडील मोबाईल फोनची तपासणी केली असता आरोपी राहुल गंगाधर शिंदे यांनी त्यांचे मोबाईल फोनवरुन बी.एम.डब्ल्यू.या व्हॉटस्अप ग्रुपवर वर सदर प्रकरणांची अश्लील व्हिडीओ प्रसारीत केले असल्याचे दिसुन आले आहे.त्यामुळे पोलिसांनी ही बक्षिसी दिली असल्याचे समजले जात आहे.

  राज्यभरात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक उर्फ लक्षण खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत.आता,भोंदूबाबा खरात यांच्या शिवनिका संस्थानचे बँक अकाउंट सील करण्यात आले असून,आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे.विशेष तपास पथकाकडून कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन,घर,दुकाने याबाबत माहिती मागवण्यात आली आहे.नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तांचा शोध सुरू आहे.याबरोबरच भोंदूबाबा खरात यांच्या विरोधात आतापर्यंत दाखल केलेले सर्व दहा गुन्हे एस.आय.टी.च्या माध्यमातून तपासले जाणार आहेत.प्रकरणात खरातच्या राज्यातील मालमत्तेची सखोल चौकशी केली जाणार असून,त्यांच्या कोट्यवधींच्या आर्थिक संपत्तीची उघड होण्याची शक्यता आहे.तसेच,मालमत्ता खरेदीसाठी पैसे कुठून आले याचा तपासही करण्यात येणार आहे.नाशिकचा आरोपी कोंबडीचोर अशोक खरात आणि त्याच्या साम्राज्याचे धक्कादायक पैलू एकामागून एक समोर येत आहेत.केवळ अंधश्रद्धा आणि फसवणूकच नाही,तर स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकारही उघड होत आहेत.कोपरगाव तालुक्यातील मढी येथे खरातच्या निकटवर्तीय हस्तकांनी खरातच्या राजकीय प्रभावाचा वापर करत शेतकरी नारायण आभाळे यांचा शेताकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता अडवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.परिणामी,गेल्या तब्बल दोन वर्षांपासून त्या शेतकऱ्याची ऊसतोडच होऊ शकलेली नाही.अशी माहिती समोर आलेली असताना काही आंबट शौकीन त्याचे आणि महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून पुण्य (!) कमवत असल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस येत आहे.त्यासाठी सरकारने आक्षेपार्ह चलचित्रण प्रसारीत करण्यास प्रतिबंध केलेला असताना काही असामाजिक तत्व महिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेची तमा न बाळगता सदर चलचित्रण प्रसारीत करून सामाजिक वातावरण दूषित करत असल्याचे उघड झाले आहे.त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात असा पहिला गुन्हा दाखल झाला आहे.या बाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस देऊन याबाबतची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

 

“कोणाकडेही पिडीत महिलेची,तिचे नातेवाईक, घराची,कुटुंबियाची ओळख उघड होईल असे व्हिडीओ किंवा अश्लिल व्हिडीओ असल्यास ते तात्काळ डिलीट करावे ते प्रसार माध्यामांवर प्रसारीत करु नये असे व्हिडीओ प्रसारित केल्यास सबंधीतांवर व सबधीत प्रसार माध्यमांचे ग्रुप ॲडमिनवर गुन्हा दाखल करून अटक करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल”-रामकृष्ण कुंभार,पोलिस निरीक्षक,कोपरगाव शहर पोलिस ठाणे.

  त्यात त्यांनी म्हटले आहे की,”काल दि.२५मार्च रोजी दुपारी १२ वा चे सुमारास नाशिक येथे अशोक खरात याने महिलांना जादूटोणा,भोंदूगिरी करुन लैगींग अत्यावर केले प्रकरणी गुन्हे दाखल असुन त्या गुन्हयातील पिडीत महिलांचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हॉटस्अपवरती प्रसारीत होत असले बाबतची माहीती मिळाल्याने पोलीसांनी आरोपी शिवाजी रोड येथील आरोपी राहुल गंगाधर शिंदे,मोहिनीराज येथील आरोपी योगेश पढरीनाथ आढाव (वय-५० वर्षे) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडील मोबाईल फोनची तपासणी केली असता आरोपी राहुल गंगाधर शिंदे यांनी त्यांचे मोबाईल फोनवरुन बी.एम.डब्ल्यू.या व्हॉटस्अप ग्रुपवर वर सदर प्रकरणांची अश्लील व्हिडीओ प्रसारीत केले असल्याचे दिसुन आले आहे.सदरचे व्हिडीओ हे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील आरोपी तरुण संदिप गर्जे यांचेकडून सदर आरोपीतांना व्हॉटस्अपवर पाठविलेले होते.

  दरम्यान ही पक्की खबर मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी श्रीकांत बाळु कुन्हाडे यांचे फिर्यादीवरुन वरील तिन्ही आरोपीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दप्तरी नोंद क्र.गु.१४७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम २९४ (२),३(५) सह माहीती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (अ) प्रमाणे काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान यातील तिन्ही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.

  दरम्यान सदरचे प्रकरण हे संवेदनशिल व गंभीर असुन यामध्ये ब-याच महिला पिडीत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.त्या दृष्टीने अतिशय संवेदनशिलरित्या व गोपनीयरित्या तिची ओळख उघड होणार नाही याची खबरदारी घेवुन तपास यंत्रणा काम करत आहे.तरीही,”कोणाकडेही पिडीत महिलेची ओळख तिच्या नातेवाईकांची ओळख,तिच्या घराची ओळख,तिच्या कुटुंबियाची ओळख उघड होईल असे व्हिडीओ किंवा अश्लिल व्हिडीओ असल्यास ते तात्काळ डिलीट करावे ते प्रसार माध्यामांवर प्रसारीत करु नये असे व्हिडीओ प्रसारित केल्यास सबंधीतांवर व सबधीत प्रसार माध्यमांचे ग्रुप ॲडमिनवर गुन्हा दाखल करून अटक करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी शेवटी दिला आहे.त्यामुळे आंबटशौकीन तरुणांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close