जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बाजारपेठ वाढीसाठी व्यापारी महासंघाचा “ऑनलाईन कट्टा”

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जगभर पसरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगात व भारतात सुरु असलेल्या टाळेबंदीचा बाजारपेठेवर काय परिणाम होईल ? विशेषतः कोपरगावच्या बाजारपेठेवर काय परिणाम होईल ? या विषयावर दुरचलचित्रणाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रातून ही आपत्तीपेक्षा इष्टापत्ती समजून काम केले तर येणाऱ्या मंदीतही चांगली संधी असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी नुकतेच व्यक्त केले आहे.

कोपरगावचे उद्योगपती व बँकिंग तज्ज्ञ कैलास ठोळे म्हणाले कि, ‘या मंदीमुळे बँकांचे कर्जाचे व्याजदर कमी होणार असल्याने व्यापार व उद्योगासाठी बँकांकडून पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकेल, याचा फायदा व्यापारी व उद्योजकांनी व्यापार व व्यवसाय वाढीसाठी करावा.

देशात व राज्यात कोरोनाच्या दहशतीने नागरिक आपापल्या घरात बसून आहे.या प्रतिकूल परिस्थितीत नेमका वेळेचा सदुपयोग कसा करायचा याची भ्रांत नागरिकांना पडलेली असताना कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाने मात्र संकटातही संधी शोधण्याचे काम करत व्यापाऱ्यांना दुरचलचित्रणाच्या माध्यमातून चर्चासत्र आयोजित करून एक वेगळा पायंडा पाडला आहे.या वेळी व्यापारी व नागरिकांनी आपली मतमतांतरे व्यक्त केली आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक महासंघाचे सचिव सुधीर डागा यांनी केले तर कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहनलाल झंवर यांनी ‘किराणा दुकाने, मेडिकल वगळता इतर उद्योगधंदे गेले महिनाभर बंद आहे. ते कधी सुरु होतील ? याची शाश्वती नाही. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन नंतरची अर्थव्यवस्था कशी असेल ? यावर तज्ञांनी मत व्यक्त केले. स्टॉक मार्केटचे अभ्यासक अशोक अजमेरे म्हणाले कि,‘शेअर मार्केट मध्ये मंदी आहे हीच संधी समजून व्यापाऱ्यांनी गुंतवणूक करावी. विशेषत: औषधे उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये निश्चितच चांगली संधी आहे.’

कोपरगावचे उद्योगपती अरविंदजी भन्साळी म्हणाले कि,‘नागपूरहून मुंबईला जोडणाऱ्या महामार्गामुळे कोपरगावकरांना सहजासहजी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे परिसरात औद्योगिक क्षेत्र वाढण्यास चांगला वाव आहे.कोपरगाव शहरातील राजकारणी मंडळींनी या परिसरात छोटे उद्योग उभारणेसाठी औद्योगिक वसाहत करावी किंवा मोठ्या उद्योगपतींनी छोट्या उद्योगपतींना बरोबर घेऊन खाजगी औद्योगिक क्षेत्र विकसित करावे.

कोपरगाव शहराचे सराफ व्यापारी तुलसीदास खुबाणी व दिपक विसपुते चर्चेत भाग घेताना म्हणाले कि, ‘सोने व चांदीत गुंतवणूक करण्यास चांगली संधी आहे. त्याचा देखील ग्राहक वर्गांनी विचार करावा.’ महिला उद्योजिका शालिनी खुबाणी म्हणाल्या कि,‘ चैनीच्या वस्तूंचा खप पुढील काळात कमी होऊन केवळ गरजेच्या वस्तूकडे ग्राहकांचा कल असलेला दिसून येणार आहे.’ या चर्चेत सुटे चहाचे व्यापारी नारायण अग्रवाल, साखर व्यापारी राजेंद्र बंब, बिल्डींग मटेरियल सप्लायर्स भीमजीभाई पटेल, नगरसेवक सत्येन मुंदडा यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता.
संचारबंदी असताना देखील अशाप्रकारचे अभिनव चर्चासत्र आयोजित करून कोपरगावच्या बाजारपेठेला चालना देण्याचा प्रयत्न कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन व समता पतसंस्थेने केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close