निवडणूक

४१ महिने उलटूनही शहराला रोज पाणी नाही,जबाबदार कोण?

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगांव शहरासाठी सुमारे १३१ कोटी २४ लाख रूपये खर्चाच्या योजनेचे उद्घाटन 25 जुलै 2022 रोजी मोठे ढोल बडवून संपन्न झाले होते व ते आगामी 24 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याच्या बाता मारण्यात आल्या होत्या मात्र मुदत संपून जवळपास दिड वर्षे उलटूनही काम पूर्ण न झाल्याने या बाबत चौकशी करावी अशी मागणी कोपरगाव येथील कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी कोपरगाव दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे नुकतीच केली आहे.त्यामुळे या पाणी योजनेच्या बातम्या या एरंडाचे गुऱ्हाळ ठरले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोपरगाव शहरातील कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी पाणी योजनाच्या चौकशीची  मागणी केली असली तरी वर्तमानात सत्तेत भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आ.आशुतोष काळे आमदार असलेल्या कोपरगाव पाणी योजनेची खरेच चौकशी होणार का ? की मागील सत्ताधारी कोल्हे गटासारखे केवळ नगरपरिषद निवडणूक काढून घेणार व मतदारांना गाजर दाखवणार असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.



   कोपरगाव शहर पाणी योजनेसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत १३१.२४ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला होता.त्याची निविदा जाहीर होऊन सदरचे काम गुजरात मधील सुरत येथील ‘लक्ष्मी कन्ट्रक्शन’ या कंपनीस दिले होते.सदर काम चाचणी कालावधीसह दोन वर्षात दि.३० जून २०२४ पूर्वी पूर्ण करावयाचे होते.त्यावेळी कोपरगाव शहरासाठी यापूर्वी चार साठवण तलाव असताना व जलसंपदा विभागाकडून पुरेसे पाणी मंजूर असतानाही शहराला पाणी कमी आहे असा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जावई शोध लावून त्यावर आपल्या राजकीय फायद्यासाठी बनाव उभा करणाऱ्या व ४२ कोटींच्या केंद्रीय पाणी योजनेची वासलात लावणाऱ्या व कारण नसताना निळवंडे धरणाच्या जलवाहिणीचे गाजर दाखविणाऱ्या नेत्यांना चाप लावण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शहरासाठी नवीन पाणी मंजुर केले होते.या शिवाय साठवण तलावाची उणीव दूर करण्यासाठी कोपरगाव शहरासाठी नूतन साठवण तलावासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत १३१.२४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.त्याची निविदा मंजूर झाल्यानंतर सदर काम चाचणी कालावधीसह दोन वर्षात दि.३० जून २०२४ पूर्वी पूर्ण करावयाचे होते.त्यासाठी मोठे ढोल बडवून सदर काम वेळेत पूर्ण करण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या होत्या.

  

दरम्यान मध्यंतरी कोपरगाव येथील या पाणी योजनाच्या पाठपुरावा करणारे कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी सदर योजनेला ईशान्यगडाने मोठी मदत केल्याचा दावा केला होता व त्या गडावरील नेत्यांकडून गळ्यात हार घालून घेतला होता.त्याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.आज पुन्हा एकदा कोपरगाव नगरपरिषद निवडणूक तोंडावर आली असताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

   दरम्यान सदर योजनेचे काम वेळेवर करण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी शांताराम गोसावी दर आठवड्यास तर आ.काळे हे दर पंधरवाड्यास आढावा बैठक घेणार असल्याची आवई उठवली होती.ती शेवटी आवईच ठरली असल्याचे उघड झाले आहे.रोज पाणी आजही शहर वासियांसाठी दिवास्वप्न ठरले आहे.यासाठी ऑनलाईन कागदपत्रे देऊन शहरातील कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे पाठपुरावा केला होता.

    सदर कामाबाबत मंत्रालय मुंबई येथे वेळोवेळी निवेदने पाठवुन सदर काम मार्गी लावावे म्हणून कळविले होते.सदर योजनेचे काम २४ महिन्यांत पुर्ण करण्याचे आदेश होते मात्र त्याचा कालावधी दिवसेंदिवस वाढुन योजना सुरू होऊन नुकतेच ४१ महिने पुर्ण झाले आहेत.तरीही सदर पिण्यांच्या पाण्याची योजना रेंगाळलेली नाही तर ‘ बशा बैल ‘ बनली आहे.त्याबाबत आपण सातत्यांने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत आहे.नगरविकास विभागाकडे नुकतीच बैठक होती त्यास उपस्थित राहुन या कामाची मागणी पुर्ण व्हावी म्हणून राजेश मंटाला यांनी विनंती केली होती.शासन स्तरावर सुमारे १३१ कोटी २४ लाख रूपयांचा निधी वितरीत होवुनही त्याचे काम पुर्ण का झाले नाही म्हणून आपण चौकशी सुरू केली असल्याबाबत त्यांनी कळवले आहे.त्याबाबत नगरविकास विभागाच्या अधिका-यांनी लवकरात लवकर सदर योजनेचे काम बैठक घेवुन मार्गी लावु म्हणून आश्वासित केले आहे.तेंव्हा मुख्यमंत्री या नात्यांने आपण या योजना कामात लक्ष घालावे व कोपरगांव शहरवासियांसाठी सदर पिण्यांच्या पाण्यांची योजना तात्काळ पुर्ण करावी यासाठी आपले स्तरावर संबंधीतांना तात्काळ आदेश करावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात नुकतीच कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी शेवटी केली आहे.त्यामुळे सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आ.आशुतोष काळे आमदार असलेल्या कोपरगाव पाणी योजनेची खरेच चौकशी होणार का ? की मागील सत्ताधारी कोल्हे गटासारखे केवळ नगरपरिषद निवडणूक काढून घेणार व मतदारांना गाजर दाखवणार असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.

   दरम्यान मध्यंतरी कोपरगाव येथील या पाणी योजनाच्या पाठपुरावा करणारे कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी सदर योजनेला ईशान्यगडाने मोठी मदत केल्याचा दावा केला होता व त्या गडावरील नेत्यांकडून गळ्यात हार घालून घेतला होता.त्याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.आज पुन्हा एकदा कोपरगाव नगरपरिषद निवडणूक तोंडावर आली असताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिल्याने पाणी योजना पूर्ण करण्यासाठी ही निवेदन आहे की,निवडणूक काढण्यासाठी असा मतदारांत संभ्रम निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close