जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
लोकसभा कामकाज

कांदा खरेदी केंद्रे सुरू करा -…या खासदारांची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले असून गेल्या काही आठवड्यांपासून कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होत असून शेतकऱ्यांचा कांदा बाजारात अवघ्या ८०० ते १,२०० रुपये प्रती क्विंटल या कवडीमोल दराने विकला जात असल्याने त्या मुळे सरकारने यात हस्तक्षेप करण्याची मागणी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कृषी व किसान कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांचेकडे एका पत्रा‌द्वारे केली आहे.

“केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी लक्षात घेऊन कॅनडा व इतर देशांना कांदा निर्यात तातडीने सुरू करावी.या शिवाय नाफेडमार्फत कां‌द्याची खरेदी करणे गरजेचे आहे.या शिवाय कांदा पिकाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देणे कां‌द्याला प्रती क्विंटल किमान १,२०० ते १,५०० रुपयांचे अनुदान मिळणे गरजेचे बनले आहे”- खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा.

  महाराष्ट्रात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घटले असून,शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे,कारण मागील अनेक महिन्यांपासून कांद्याला भाव मिळत नाही.अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने,शेतकऱ्यांवर उत्पादन केलेला कांदा फेकून देण्याची किंवा विकण्याची वेळ आली आहे.या परिस्थितीत,शेतकरी शासनाकडून तातडीच्या हस्तक्षेपाची आणि योग्य दराची मागणी करत आहेत.या पार्श्वभूमीवर शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी  केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे लक्ष वेधले आहे.

   याबाबत पुढे बोलताना म्हणाले की,”सध्या हजारो टन कांदा चाळीत साठवलेला असून हवामानातील अचानक आणि अनियमित बदलामुळे हा कांदा झपाट्‌याने खराब होऊ लागला आहे.कां‌द्याला योग्य भाव नाही आणि साठवणुकीतील नासाडीचा मोठा फटका अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.रोपवाटिका तयार करणे, लागवड,मजुरी,खते,सिंचन तसेच साठवणूक यावर शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत.मात्र सध्याचा बाजारभाव इतका तुटपुंजा आहे की,तो खर्चही परत मिळत नाही. म्हणून शेतकरी यांचेमध्ये तीव्र नाराजी असून शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.असे नमूद करून कॅनडा व इतर देशांना कांदा निर्यात तातडीने सुरू करण्याची परवानगी देणे गरजेचे आहे.या शिवाय नाफेडमार्फत कां‌द्याची खरेदी करणे गरजेचे आहे.या शिवाय कांदा पिकाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देणे कां‌द्याला प्रती क्विंटल किमान १,२०० ते १,५०० रुपयांचे अनुदान मिळणे देवून शेतकरी यास दिलासा द्यावा.तसेच कां‌द्यासोबतच जिल्ह्यातील कापूस,सोयाबीन,मका,तूर या पिकांनाही बाजारात किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दर मिळत आहेत.त्यामुळे शासनाने प्रत्येक तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र तातडीने सुरू करून या पिकांची खरेदी करावी, अशीही मागणी खा.वाकचौरे यानी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close