व्यापार
लिलाव झाल्यावर कांद्याचे दर व्यापाऱ्याने केले कमी,धक्कादायक प्रकार !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
वर्तमानात वाढलेला उत्पादन खर्च व घटलेली उत्पादकता,त्यातच मॉन्सूनपूर्व आणि आता परतीच्या पावसाने झालेले कांद्याचे नुकसान,बाजारात नव्याने येत असलेला पोळ कांदा,देशात होत असलेली कांदा आयात या सर्व बाबी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीच्या ठरत असताना आता व्यापारीही लिलाव जाहीर करून कांदा आपल्या गोदामात खाली करताना शेतकऱ्यांना बोळात गाठून दर कमी करत असल्याने कोपरगाव,राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती साहेबराव रोहम यांचेशी भ्रमनध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी,याबाबत आपण बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”जुलै व ऑगस्ट महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात सरासरी प्रतिक्विंटलला १,५०० रुपये दर मिळत असताना ते आता राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये ८०० ते १,१०० रुपयांपर्यंत दर खाली आले आहेत.त्यातच सरकारने आता परदेशी होणाऱ्या कांद्याच्या आयातीवरील कर रद्द केल्याने कांदा उत्पादकांना तोंड बडविण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.
दरात घसरण झाल्याने दोन पैसे दूर; मात्र उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन अडचणी वाढत आहे. राज्यात नाशिक,पुणे,अहिल्यानगर,धाराशिव, सोलापूर,छ.संभाजीनगर,धुळे आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रब्बी कांद्याचे उत्पादन झाले आहे.मात्र मागणी मंदावल्याने पुरवठा घटला.त्यातच केंद्राने हस्तक्षेप केल्याने निर्यात संधीही कमी झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.

“आपल्याशी संबंधित शेतकऱ्याने तक्रार केली असून आपण बाजार समितीचे कर्मचारी लोखंडे आणि आणखी एक जण घटनास्थळी पाठवले आहे.पुढे बोलताना त्यांनी ट्रॅक्टर मध्ये कांदा असेल तर व्यापाऱ्याला त्याची प्रत तपासणी करणे सोपे जाते.मात्र रिक्षा किंवा तत्सम वाहन असेल तर एकाच बाजूने प्रतवारी तपासता येते त्यामुळे मागील बाजूचा माला बाबत व्यापाऱ्याची संदिग्धता राहत असल्याने काही वेळा प्रश्न तयार होतो.अशा वेळी तक्रार आल्यास बाजार समितीचा कर्मचारी घटनास्थळी जाऊन शहानिशा करून त्यावर तोडगा काढत असतो”-नानासाहेब रणशूर,सचिव,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.
दरम्यान मध्य प्रदेशमध्ये कांद्याची उपलब्धता असल्याने उत्तर भारतात तर दक्षिण भारतातील कर्नाटक व आंध्र प्रदेश या भागांतून नवीन खरीप कांद्याची आवक वाढू लागल्याने मागणीवर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे.तर पुढील काही महिन्यात राजस्थान व त्यानंतर महाराष्ट्रातील नवीन खरीप कांदा बाजारात येत आहे.मात्र विविध मागण्यांनंतरही केंद्र सरकार धोरणात्मक बाजू विचारात घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे.उलट आयातीवरील ११ टक्क्यांचे शुल्क हरवले असल्याने शेतकऱ्यांना कोणी वाली राहिला नसल्याचे उघड होत आहे.आता हि साडेसाती कमी की काय कांदा व्यापारी उत्पादक शेतकऱ्यांना लुटू लागला असल्याचे दुर्दैवी चित्र कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड झाले आहे.
याबाबत आमच्या न्यूजसेवाच्या प्रतिनिधीशी बोलताना राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथील शेतकरी अप्पासाहेब तूरकणे यांनी बोलताना म्हटले आहे की,आपण आज कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्त दर मिळेल या मोठ्या अपेक्षेने १५-१६ क्विंटल कांदा आपल्या वाहनाने आणला होता.त्याचा १२०० रुपये क्विंटल दराने लिलावही झाला होता.मात्र कांदा लिलाव घेणारे एस. एम.टी.ठकराल या व्यापाऱ्याने कांदा आपल्या गोदामात खाली करून घेताना मात्र भूमिका बदलली असून शेतकऱ्यास बोळात गाठून दर कमी घेण्याबाबत बोलू लागला होता.याबाबत आपण बाजार समितीचे सचिव रणशूर यांचेकडे तक्रार केली होती.याबाबत दखल घेतली जाणे अपेक्षित होते असे त्यांनी म्हटले आहे.मात्र तसे झाले नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याशी संबंधित शेतकऱ्याने तक्रार केल्याची कबुली देऊन आपण बाजार समितीचे कर्मचारी लोखंडे आणि आणखी एक जण घटनास्थळी पाठवले असल्याचे सांगितले आहे.पुढे बोलताना त्यांनी ट्रॅक्टर मध्ये कांदा असेल तर व्यापाऱ्याला त्याची प्रत तपासणी करणे सोपे जाते.मात्र रिक्षा किंवा तत्सम वाहन असेल तर एकाच बाजूने प्रतवारी तपासता येते त्यामुळे मागील बाजूचा माला बाबत व्यापाऱ्याची संदिग्धता राहत असल्याने काही वेळा प्रश्न तयार होतो.अशा वेळी तक्रार आल्यास बाजार समितीचा कर्मचारी घटनास्थळी जाऊन शहानिशा करून त्यावर तोडगा काढत असल्याची सबब सांगितली आहे.तथापि या तक्रारीचे निरसन केले जाईल असे आश्वासन शेवटी दिले आहे.
. याबाबत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती साहेबराव रोहम यांचेशी भ्रमनध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी,याबाबत आपण बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे.