जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

गंगुबाई बांगर यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर (प्रतिनिधी)

  कोपरगांव येथील सेवानिवृत्त शिक्षक भास्करराव बांगर यांच्या मातोश्री श्रीमती गंगुबाई आनंदा बांगर यांचे गुरुवार दि. ३१ जुलै  रोजी वृध्दापकाळाने निधन झाले आहे, मृत्यूसमई त्या ८५ वर्षाच्या होत्या.कोपरगांव येथील अमरधामध्ये रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

 

   श्रीमती गंगुबाई या संवत्सर येथील रहिवासी होत्या.धार्मिक व मनमिळावू स्वभावाने त्या संवत्सर पंचक्रोशीत परिचित होत्या.त्यांचे पती आनंदा बांगर हे शेती महामंडळामध्ये मुकादम म्हणून रामवाडी,लक्ष्मणवाडी येथे कार्यरत होते. त्यांचेही चार वर्षापूर्वी निधन झालेले आहे.

  त्यांचे सुपूत्र सेवानिवृत्त शिक्षक भास्करराव बांगर हे सद्या कोपरगांव येथे वडांगळे वस्ती परिसरात वास्तव्यास आहेत.श्रीमती गंगुबाई बांगर यांच्या पश्चात मुलगा,सून,नातवंडे,दोन मुली असा मोठा परिवार आहे .

  त्यांच्या अंत्यविधीसमयी विविध क्षेत्रातील मान्यवर,शिक्षक व संवत्सर परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या निधणाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close