कृषी विभाग
…या तालुक्यात ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यात यंदा खरीप हंगामाला वेळेआधीच सुरूवात झाली असून आजअखेर तब्बल ३७,५०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६४,८९५.७९ हेक्टर असून खरीपाचे सरासरी क्षेत्र ४४,४४७ हेक्टर आहे.

राहाता तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रावर हा संरक्षित युरिया उपलब्ध असून अद्ययावत साठ्याची माहिती https://adonagarzp.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding.html या लिंकवर पाहता येईल.दरम्यान,डीएपी खताचा पुरवठा मर्यादित असल्याने पर्यायी मिश्र खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
यंदा मान्सूनचे आगमन साधारण १५ दिवस आधी झाल्याने पेरण्या वेळीच झाल्या असून शेतकऱ्यांकडून युरियाच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून कृषी विभागाने २८० मेट्रिक टन युरिया संरक्षित साठा मंजूर केला आहे. यातील १४० मेट्रिक टन युरिया १ जुलै रोजी खुला करण्यात आला असून ३ जुलै रोजी उर्वरित १४० मेट्रिक टन संरक्षित साठाही शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे.
राहाता तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रावर हा संरक्षित युरिया उपलब्ध असून अद्ययावत साठ्याची माहिती https://adonagarzp.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding.html या लिंकवर पाहता येईल.
दरम्यान,डीएपी खताचा पुरवठा मर्यादित असल्याने पर्यायी मिश्र खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.डीएपीमध्ये १८ टक्के नत्र व ४६ टक्के स्फुरद असते. त्याऐवजी लिक्विड नॅनो डीएपी, तसेच १०:२६:२६, १२:३२:१६, २०:२०:०, २४:२४:० या मिश्र खतांचा योग्य प्रमाणात वापर करूनही परिणाम साधता येतो. यासोबतच युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व पालाश यांच्या मिश्रणाचा वापर डीएपीला पर्याय ठरतो. तसेच मोनो अमोनियम फॉस्फेट व प्रोम डीएपी चा वापरही शेतकरी करू शकतात.तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्धतेनुसार पर्यायी खतांचा वापर करावा व अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले आहे.