गुन्हे विषयक
पैशासाठी महिलेचा बळी,चार जणांवर गुन्हा !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील घोयेगाव हद्दीत रहिवासी असलेला आरोपी नवरा महेश भिमराज भाटे,सासरा भीमराव मगन भाटे,सासू संगीता भीमराज भाटे,आजे सासू पार्वताबाई मगन भाटे आदींनी दि.२८ मे रोजी नवऱ्याचे दुकान बंद पडले ते सुरू करण्यासाठी आपल्या माहेराहून ०५ लाख रुपये आणावे या साठी मयत महिला दिक्षा महेश भाटे (वय -२४) तिला वारंवार मारहाण करून तिचा छळ केला असून तिला गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याबाबत वरील सर्व आरोपी विरुध्द मयत मुलीचा ब्राम्हणगाव येथील पिता छबू रघुनाथ शिंगाडे (वय-४८) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने घोयेगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील घोयेगाव येथे दिनाक २८ मे २०२५ रोजी रात्री ०८ च्या सुमारास घडली आहे.यातील मयत विवाहित महिला दिक्षा भाटे हीने रात्री ०८ च्या सुमारास आपल्या बेडरूममध्ये घराच्या छताला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.नवरा,सासरा,सासू,आजे सासू आदी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय कुटुंबव्यवस्थेची मोठी शोकांतिका म्हणजे आजही वाढत चाललेली हुंडाबळींची संख्या किंवा त्यापायी होणारा स्त्रियांचा छळ,भारतीय समाजरचनेतील स्त्रीचं दुय्यमत्व,पारंपरिक विचारांच्या पगड्यातून न झालेली सुटका,आर्थिक असमानता यामुळे निर्माण झालेल्या या हुंडयाची समस्या कायमस्वरूपी नष्ट व्हावी या हेतूने १९६१ मध्ये म्हणजे ६३ वर्षांपूर्वी हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात येऊन हुंड्यासाठी बळी घेणाऱ्या व्यक्तीला फाशीसारखी शिक्षाही सुनावली गेली; पण या समस्येची दाहकता कमी झालेली नाही.परिणामी ‘हुंडा’ या शब्दाची व्याप्ती वाढवून स्त्रियांना संरक्षण देणारे विविध हुंडाविरोधी कायदे करण्यात आले तरीही कायद्याचा धाक बसण्याऐवजी त्यातील पळवाटांमुळे त्याची धार कमी होत गेली.दरवर्षी हुंडयाप्रकरणी दाखल होणाऱ्या तक्रारींच्या संख्येवर नजर टाकली तर त्याची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे,पण त्यातील भीतीदायक गोष्ट म्हणजे त्यातील शिक्षेचे अत्यल्प प्रमाण.गुन्हा नोंदवलाच जात नाही किंवा मागे घेतला जात असल्याने या प्रकरणातील अरोपींना मोकळं रान मिळतं.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील घोयेगाव येथे दिनाक २८ मे २०२५ रोजी रात्री ०८ च्या सुमारास घडली आहे.यातील मयत विवाहित महिला दिक्षा भाटे हीने रात्री ०८ च्या सुमारास आपल्या बेडरूममध्ये घराच्या छताला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.
यातील मयत तरुणीचा पिता छबू शिंगाडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,”आपली मुलगी सासरी नांदत असताना यातील आरोपी नवरा महेश भिमराज भाटे,सासरा भीमराव मगन भाटे,सासू संगीता भीमराज भाटे,आजे सासू पार्वताबाई मगन भाटे आदींनी दि.२८ मे रोजी नवऱ्याचे दुकान बंद पडले ते सुरू करण्यासाठी आपल्या माहेराहून ०५ लाख रुपये आणावे या साठी मयत महिला दिक्षा महेश भाटे (वय -२४) तिला वारंवार मारहाण करून तिचा छळ केला असून तिला गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केले आहे.तिचे अंतिम संस्कार व सर्व विधी करून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१७१/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३चे कलम ८०,८५,(३),५ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांचेसह पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आदींनी यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चौधरी हे करीत आहेत.