विशेष दिन
…या ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच सारिका विजय थोरात यांचे अध्यक्षतखाली व युवक कार्यकर्ते एकनाथ थोरात यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

महाराष्ट्र दिन हा राज्याची सुट्टीचा दिवस आहे.१ मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन झाले.त्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.या दिवसाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन साजरा करतात.जवळके ग्रामपंचायत येथे हा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
महाराष्ट्र दिन हा राज्याची सुट्टीचा दिवस आहे.१ मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन झाले.त्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.या दिवसाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र दिन साजरा करतात.या दिवशी परेड,राजकीय भाषणे आणि विविध कार्यक्रम होतात.महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी जपली जाते.मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत येथे हा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी ग्रामपंचायतचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,माजी उपसरपंच विजय थोरात,उपसरपंच सुनील थोरात,ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई नवनाथ शिंदे,वनिता रखमा वाकचौरे,रखमा वाकचौरे,संदीप थोरात,नामदेव थोरात,विजय शिंदे,भिकाजी थोरात,संजय शिंदे,ग्रामपंचायत अधिकारी सतीश दिघे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.त्यावेळी राष्ट्रगीत गायल्यानंतर महाराष्ट्र गीत गायन करण्यात येऊन ध्वजास उपस्थितांनी मानवंदना दिली आहे.
सदर ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ग्रामसभेकडे नागरिक रवाना झाले आहे.उपस्थितांचे आभार विजय थोरात यांनी मानले आहे.