गृह विभाग
…या ठिकाणी होमगार्ड दिन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
होमगार्ड वर्धापन दिन दरवर्षी डिसेंबर महिन्यात साजरा केला जातो.हा दिवस देशभरात होमगार्ड आणि नागरी संरक्षण स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो.या दिनानिमित्त,अनेक जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये ७ ते १३ डिसेंबर या कालावधीत होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.कोपरगाव येथे नुकताच हा दिन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला आहे.

होमगार्ड दलाची स्थापना सर्वप्रथम डिसेंबर १९४६ मध्ये मुंबई प्रांतात (तत्कालीन) नागरी अशांतता आणि जातीय दंगलींना आळा घालण्यासाठी पोलिसांना मदत करण्याच्या उद्देशाने स्वयंसेवी दल म्हणून करण्यात आली होती.त्या निमित्त हा स्थापना दिन साजरा होतो.
होमगार्ड दलाची स्थापना सर्वप्रथम डिसेंबर १९४६ मध्ये मुंबई प्रांतात (तत्कालीन) नागरी अशांतता आणि जातीय दंगलींना आळा घालण्यासाठी पोलिसांना मदत करण्याच्या उद्देशाने स्वयंसेवी दल म्हणून करण्यात आली होती.त्या निमित्त हा स्थापना दिन साजरा होतो.कोपरगाव येथेही हा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.या सप्ताहादरम्यान स्वच्छता अभियान,कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण,प्रथमोपचार आणि बचाव कार्याची प्रात्यक्षिके,वाहतूक नियमांचे पालन,सामाजिक एकता यांसारख्या विषयांवर पथनाट्ये,परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले आहे.
सदर कार्यक्रमासाठी समादेशक अधिकारी अतुल पाटील,पोलीस हवालदार लिंबोरे,पोलीस कॉन्स्टेबल बाळू धोंगडे,होमगार्ड रवी खुडे,महेश आरंगडे,शरद शिंगाडे,शेख सुभान,संजय मोकळ,रविंद्र घोरपडे,अमित खोकले आदिसह बहुसंख्य होमगार्ड उपस्थित होते.



