शैक्षणिक
…या गावात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कोपरगाव पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पी.एन.तोरवणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी कोकमठाण ग्रामपंचायतीच्या सरपंच विधाताई अरविंद रक्ताटे,उपसरपंच दीपक रोहम,ग्रामपंचायत सदस्य संतोष लोंढे,मंडलाधिकारी सौ.कोल्हे आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्य सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान यावेळी १२५ गुणवंत शिक्षक,विद्यार्थ्यांना व अधिकाऱ्यांना,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत अधिकारी,कर्मचारी,महसूल अधिकारी,कर्मचारी,महावितरण कर्मचारी आदींना सन्मानचिन्ह,शाल,पुष्प गुच्छ देण्यात आले आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक आत्मा मालीक स्कूल चे शिक्षक श्री कांबळे यांनी केले आहे तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे तर आभार ग्रामपंचायत सदस्य संजय दंडवते यांनी मानले आहे.