जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

…या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची प्रजासत्ताक संचालन पूर्वशिक्षणासाठी निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञान शाखेचा विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक धर्मनाथ बाबूराव काकड याची केंद्र सरकार युवा खेल,मंत्रालय महाराष्ट्र राज्य शासन,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय प्रजासत्ताक संचालनपूर्व प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी दिली आहे.

      

निवडपूर्व चाचणी मध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) स्वयंसेवक विद्यार्थी धर्मनाथ काकड याची पश्चिम विभागीय राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनपूर्व प्रशिक्षणाकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथे निवड झाली आहे.

  दरवर्षी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनी संचलनाचे दि.२६ जानेवारी रोजी आयोजन करण्यात येते.याकरीता दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलन (एस.आर.डी./एन.आर.डी.) शिबिरा साठी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे २६ ते २८ सप्टेंबर २०२४  रोजी घेण्यात आलेल्या निवड चाचणी मध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) स्वयंसेवक विद्यार्थी धर्मनाथ काकड याची पश्चिम विभागीय राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनपूर्व प्रशिक्षणाकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथे निवड झाली आहे.यापूर्वी त्याची अहमदनगर विभागात ६० विद्यार्थ्यांमधून अंतिम ८ मध्ये,पुणे येथील निवड चाचणीत राज्यपातळीवर अंतिम २२ विद्यार्थ्यांमध्ये व नांदेड येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीत पश्चिम विभागीय पातळीवर अंतिम ६ विद्यार्थ्यांमध्ये निवड करण्यात आली आहे.

    कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी.आ.अशोक काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे,मॅनेजिंग गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ,प्राध्यापक,प्राध्यापिका व विद्यार्थ्यानी अभिनंदन केले आहे.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भाऊसाहेब कांबळे,प्रा. विशाल पोटे,प्रा.विनोद मैंद यांचे धर्मनाथ काकडला मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close