आंदोलन
…आता या कर्मचाऱ्यांचा मंत्र्यांना घेराव !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने आपल्याला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजुर करण्यासह निवृत्त वेतन लागू करा आदीसह सहा प्रमुख मागण्यासाठी राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या कोपरगाव तालुका शाखेच्या वतीने सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मुंबई येथील बंगल्याला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
महाराष्ट्रातील 27 हजार 920 ग्रामपंचायती मधील 60 हजार कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने दिनांक 28 जून 2024 रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष आ.बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला मात्र त्याला तीन महिने उलटूनही सरकारच्या ग्रामविकास विभागाने त्याबाबत काहीही हालचाल केलेली नाही.त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संतप्त झाली आहे.व त्यांनी पुन्हा एकदा आपले आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.त्यासाठी त्यांनी सोमवार दिनांक 30 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
सदर आंदोलनात त्यांनी आपल्या मागण्या केल्या असून त्यात,”ग्रामपंचायती नगरपालिका आणि जिल्हा परिषदाप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी,ग्रामपंचायतीची वेतनासाठी असलेली वसुलीची अट रद्द करावी,ग्रामपंचायतीच्या आकृतीबंधात अधिक सुधारणा करावी,ग्रामपंचायत कर्मचारी दहा टक्के भरती करत असताना स्थानिकपदावर अनुकंपा धरतीची योजना लागू करावी,गत 19 महिन्यापासून किमान वेतन अनुदानाची रक्कम मंजूर करूनही ती अद्याप दिलेली नाही ती त्वरित द्यावी आदी मागण्या अनेक वर्षापासून अद्याप प्रलंबित आहेत.युनियनच्या स्वाधीनता वेळोवेळी सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाची चर्चा सरकारसोबत केली आहे.मात्र त्यावर अद्याप तोडगा काढलेला नाही.आता निवडणुका जवळ येऊनही सरकार काहीही हालचाल करत नसल्याने या संघटना संतप्त झाल्या आहे.त्यामुळे सरकार आता काय भूमिका घेणार याकडे ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिकाने लक्ष लागून आहे.