जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्यावर गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात जात असताना तिचा सातत्याने पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर कोपरगाव शहर पोलिसांनी काल मध्यरात्री गुन्हा दखल केला आहे.त्यामुळे शहरात मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोमध्ये खळबळ उडाली आहे.

सदर मुलगी ही अनंत चतुर्दशी निमित्त गणपती मिरवणूक पाहण्यास आली असता आरोपीने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे व “मी कोणाला घबरत नाही” अशी धमकी दिली आहे.त्याच्या विरुध्द कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

   महिला,तरुणी,विद्यार्थिनी यांची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड,विविध समस्या,मंग़ळसूत्र हिसकावणे,शाळा,कॉलेज ठिकाणी तरुणांकडून होणारा त्रास कमी व्हावा, महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी महिला मार्शल पथक ‘दामिनी’ दहा वर्षापूर्वी सुरू झाले.आता महिलांनी एक पाऊल पुढे टाकत आपल्या शाळा,कॉलेज,खासगी शिकवणी, सार्वजनिक ठिकाणे,बाजारपेठा,सोसायट्या,कॉलन्यांमध्ये काही समस्या असल्यास ती माहिती देण्याची जबाबदारी आहे.तरच अप्रिय घटनांना आळा बसेल.
दामिनी पथकातील महिला पोलिसांना फोन केल्यास काही वेळातच आपल्याला ही मदत मिळणार असल्याचे जाहीर केले होते.मात्र या घटनेत काही कमी येण्याची चिन्हे दिसत नाही.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

   सदर मुलगी आपल्या नियोजित वेळेत महाविद्यालयात जात असताना आरोपी तरुण सानप हा तिचा एक महिन्यापासून पाठलाग करत होता.त्याने ती  त्रस्त झाली होती.काल तर त्याने कहर केला असून सदर मुलगी ही अनंत चतुर्दशी निमित्त गणपती मिरवणूक पाहण्यास आली असता आरोपीने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे व “मी कोणाला घबरत नाही” अशी धमकी दिली आहे.तिने या प्रकरणी आपल्या पालकांच्या हि बाब लक्षात आणून दिली असता त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिने सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-…/2024 भारतीय न्याय संहिता सन-2023 चे कलम 78,79,115(2) प्रमाणे पाचही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close