गुन्हे विषयक
शहरानजीक दोन लाखांची चोरी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश रासकर यांचा धारणगाव रस्त्या नजीक असलेल्या बंगल्यावर पाच ते सात चोरट्यांनी रात्री एक वाजता कडी कोयंडा तोडून 50 हजार रुपयाची चांदी व चांदीचे भांडे,पंधरा हजार रुपये रोख रक्कम व दोन हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे किंमत एक लाख 60 हजार) असा ऐवज चोरून नेला आहे अशी माहिती रासकर यांचे भाचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. त्यामुळे कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”ज्येष्ठ पत्रकार सुरेश रासकर हे सध्या प्रकृतीच्या कारणामुळे मुलगा शंकेश.रासकर यांचे कडे पुणे येथे वास्तव्यास आहे.त्यांचा धारणगाव रस्त्या लगत मोठा बंगला आहे.तेथे बंगल्याला राखणदार ठेवला आहे.मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञात पाच ते सात चोरट्यांनी पाळत ठेवून रात्रीच्या सुमारास घराचे कडी-कोयंडे तोडून बंगल्यात प्रवेश करून घरातील कपाटातील सामानांची उचकपाचक करून त्यातील पन्नास हजार रुपये रकमेची चांदी,चांदीचे भांडे,पंधरा हजार रुपये रोख रक्कम,2 हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे किंमत एक लाख साठ हजार रुपये )अशा किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. दरम्यान यावेळी रखवालदार हे झोपलेले होते.त्यांच्या घरातील टी.व्ही. ही ते घेऊन जात होते मात्र आवाजाने रखवालदार जागा झाल्याने चोरट्यांना टी.व्ही. बंगल्याच्या परिसरातच सोडून त्यांनी पळ काढला आहे.याबाबत रासकर यांचे पुतणे प्रसाद रासकर हे पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असून पोलीस त्याबाबत गुन्हा दाखल केला असल्याची बातमी आहे.
दरम्यान या घटनेने मुर्षत पुर आणि कोपरगाव ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांनी शहरातील मोठी चोरी उघडकीस आल्यानंतर आता ही चोरीही लवकर उघडकीस आणावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.