जगावेगळे
…या शहरात होत आहे कुत्र्यांचे नसबंदी शिबिर !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
श्री साईबाबांचे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या शिर्डीत मोकाट कुत्रांचा सुळसुळाट नगरपरिषदेस आणि साई संस्थानला नवीन नाही त्यामुळे अनेक साई भक्त,नागरिक जखमी व त्यांचे अपघात झाल्याची उदाहरणे असून यावर उपाय म्हणून शिर्डी येथील ‘साई टेकतारा अनिमल केअर फौंडेशन’ यांच्या वतीने व नागपूर येथील,’निर्मिती पीपल्स अँड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी”यांच्या सहकार्याने गेली चार दिवस,’भटक्या कुत्र्यांचे निर्बीजिकरण आणि अँटी रेंबीज लसीकरण मोहीम’ राबविली जात असून त्या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव टाळण्यासाठी त्यांची हत्या करण्याचा उपाय केरळ सरकारने शोधल्यानंतर गेल्या काही वर्षापासून देशभरातील प्राणिप्रेमी संघटनांकडून या निर्णयाचा निषेध नोंदवला जात होता.त्यावर उपाय म्हणून वाया जाणारे अन्न आणि मांसाच्या तुकडय़ांची योग्य विल्हेवाट लावणे,भटक्या कुत्र्यांना ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळी खायला मिळण्याची सवय न लावणे आणि मुख्य म्हणजे नर कुत्र्यांच्या बरोबरीने मादी कुत्र्यांचे निर्बीजीकरण या गोष्टी रस्त्यावरील कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील असे मत या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केल्यावर त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली होती.‘लोक भूतदयेपोटी भटक्या कुत्र्यांना खायला घालत असल्यामुळे त्यांचे माणसावरील अवलंबित्व वाढते.काही ठिकाणी प्राणिप्रेमी ठरावीक वेळी ठरावीक ठिकाणी जाऊन कुत्र्यांना खायला देतात.अशा ठिकाणी त्या ठरावीक वेळी कुत्री थांबून राहतात.त्या भागाच्या आसपास कुणी फिरकले तर त्यांच्याकडून हल्ला होण्याची शक्यता असते.भटकी कुत्री भुकेली राहत नसून ती कुठेतरी खाणे शोधतातच.त्यातून अनेक शहरात अपघात होऊन त्यातून सामाजिक अशांती वाढण्याची शक्यता वाढते.अनेक वेळा नागरिक नगरपरिषदांना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध आंदोलने करताना दिसून येत आहे.त्यावर कुत्र्यांच्या अमर्याद वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी काही नगरपरिषदांनी तोडगा काढून या कुत्र्यांना नष्ट करण्याऐवजी नर कुत्र्यांच्या बरोबरीने मादी कुत्र्यांचे निर्बीजीकरण या गोष्टी रस्त्यावरील कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील असा तोडगा काढून त्यावर शिर्डी येथील ‘साई टेकतारा अनिमल केअर फौंडेशन’ या संस्थेने अनेक महिन्यापूर्वी काम सुरू केले आहे.त्यांनी त्यासाठी ‘निर्मिती पीपल्स अँड ऍनिमल वेल्फेअर सोसायटीचे सहकार्य घेतले आहे.त्यासाठी चार दिवसीय मोहीम शिर्डीत राबवली जात आहे.या मोहिमेत शिर्डी येथील,’साई टेक ताराचे’ संस्थापक टी.एन.थापा या मोहिमेचे मार्गदर्शन करत आहेत.तर त्यांना या संस्थेचे संचालक तारा थापा,पूजा थापा,रजनी शर्मा,शुभ म्हस्के,डॉ.प्रिया थापा,प्रकाश थापा आदींचे मार्गदर्शन लाभत असून त्यांना डॉ.प्रज्वल कुमरे,डॉ.रवींद्र दोगया,डॉ.राजेंद्र सूद,या संस्थेचे व्यवस्थापक सचिन देहूडकर,महेश अवस्थी,नितीन मराठे आदी सहकार्य करत आहेत.या भटक्या कूत्र्यांना पकडणारे १४ तरुण कार्यरत असून ते ही मोहीम फत्ते करत आहे.
दरम्यान शिर्डी येथील या मोहिमेत कुत्र्यांना शिर्डी पोलीस ठाणे,साई प्रसादालय,शिर्डी बस स्थानक,पाचशे रूम,हजार रूम,शिर्डी नगरपरिषद आदी ठिकाणाहून पकडून आणले जात आहे.त्यांना नसबंदी करताना क्रमांक दिला जात असून ज्या ठिकाणाहून पकडून आणले जात आहे त्या ठिकाणचा संकेतांक दिला जात आहे.नसबंदी केलेल्या कुत्रांचा कान विशिष्ट पद्धतीने कापून त्यांची नसबंदी केली असल्याची खून केली जात आहे.त्यांना एका खोलीत डांबून त्यांचेवर योग्य उपचार करून त्यांची प्रजनन क्षमता नष्ट करण्यासाठी नसबंदी केली जात असून स्त्री जातीच्या कुत्रीचा जास्तीचा खर्च करून गर्भपिशवी काढली जात आहे.त्यांनतर त्यांना रेंबीज आणि त्वचारोगाचे प्रतिबंधात्मक इंजेक्शन दिले जात असून त्या नंतर दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाते.त्यानंतर त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था केली जात आहे.त्यानंतर त्यांना ज्या ठिकाणाहून पकडून आणले जात आहे त्या ठिकाणी परत सोडले जात आहे.त्यामुळे त्यांच्यात परकेपणाची भावना तयार होणार नाही यांची काळजी घेतली जात असून शिर्डीचे संत साईबाबांचा प्राणी मात्रांवर दया करण्याचा संदेश जपला जात असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष टि.एन.थापा यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यांच्या या उपक्रमाचे प्राणी मित्रांसह सर्वांनी कौतुक केले आहे.
दरम्यान या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी संस्थेने आपला संपर्क क्रमांक जाहीर केला आहे.मो.क्रमांक-6260 1899 01.