जलसंपदा विभाग
निळवंडे कालव्यांना दुसरे आवर्तन द्या-…यांची मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निळवंडे धरणाचे कामासह निळवंडे कालवा कृती समितीच्या याचिकेत उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर यांचे आदेशाने गत वर्षी ३१ मे २०२३ रोजी डाव्या व नंतर उजव्या कालव्यास पाण्याचे प्रथम आवर्तन सोडले होते.त्यांनतर फ्लेक्स बोर्ड लावून श्रेयवादासाठी पुढे पळणारे नेते आता गायब झाले असून प्रवरा पात्रात पाणी सोडणारे मंत्री,स्थानिक नेते या कालव्यांच्या दुसऱ्या आवर्तनाबाबत बोलण्यास तयार नसल्याने याबाबत कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे यांनी संताप व्यक्त केला असून निळवंडे कालव्यांना तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी एका प्रसिद्धी पत्रकानंव्ये केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे व विक्रांत काले यांनीं उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर खंडपीठात अड्.अजित काळे यांच्या सहकार्याने सप्टेंबर २०१६ मध्ये एक जनहित याचिका (क्रं.१३३/२०१६) दाखल करून कालव्यांचा हा प्रश्न मार्गी लावला आहे.त्याची पहिली चाचणी उच्च न्यायालयाकडून तब्बल सहा मुद्तवाढी घेतल्यानंतर व न्यायालयाने दि.१३ जुलै २०२३ रोजी आर्थिक अधिकार गोठवल्यावर न्यायालयाचे आदेशाने डाव्या कालव्यांची पहिली चाचणी विद्यमान सरकारने पंतप्रधान,मुख्यमंत्री,मंत्री,जलसंपदा विभाग आणि अधिकाऱ्यांना नामुष्की पत्करून घ्यावी लागली होती.ती डाव्या कालव्यांची चाचणी या दुष्काळी १८२ गावात अवर्षण असल्याने वाढवून जवळपास अडीच महिने सुरु होती.त्यानंतर उजव्या कालव्यांची अर्धवट चाचणी घेण्यात आली आहे.त्या अडथळा आल्याने ती मध्येच बंद करावी लागली होती.ती पुन्हा सुरु होईल अशी आशा राहुरी,संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना असताना त्यात वाट पाहून लाभक्षेत्रील शेतकरी थकून गेले आहे.मात्र अद्याप ती चाचणी पूर्ण झाली नाही.जलसंपदा विभागाने समन्यायी कायद्याच्या नावाखाली अधिकचे पाणी भंडारदरा धरणातून सोडणे गरजेचे असताना निळवंडे धरणातून अडीच टी.एम.सी.पाणी सोडले तर भंडारदरा धरण अकरा टी.एम.सी.क्षमतेचे व मोठे असताना त्यातून केवळ दिड टी.एम.सी पाणी सोडून निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रावर अन्याय केला आहे.एका माहितीनुसार सर्व तीन टी.एम.सी.पाणी निळवंडेतुन सोडले आहे. (हि माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी माहितीनुसार आहे.माहिती अधिकारात ती आमच्या प्रतिनिधीस नाकारली आहे व नगर येथील कार्यालयाकडून मागण्यास सांगितली आहे) त्यातच वर्तमानात मोठा दुष्काळ पडला आहे.दूध व्यवसाय हा रोख चलनाचा व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळ पिकांना,पिण्यास व पशुधन वाचविण्यासाठी पाणी आवश्यक आहे.वर्तमानात या दुष्काळी भागात पाणी शिल्लक नाही.त्यामुळे शेतकरी हताश झाले आहे.त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.मात्र निळवंडे प्रकल्पाचे,’जलदुत’,’जलनायक’,’करून दाखवले’,बोले तैसा आले त्याची वंदावी पाऊले” म्हणून चौकाचौकात फ्लेक्सद्वारे मिरवणारे आणि आपल्या तीन पिढ्यानीं या पाण्यासाठी प्रयत्न केले सांगणारे नेते बिळात जाऊन गायब झाले आहे.त्यामुळे दुष्काळी शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.
वर्तमानात भंडारदरा धरणातून प्रवरा नदी पात्रात आवर्तनाचे पाणी नुकतेच सोडले आहे.मात्र निळवंडे धरणाचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या भागातील नेत्यांनी ऐन निवडणुकीत वाऱ्यावर सोडले आहे.याचा जाब विचारण्याची गरज निर्माण झाली असून त्याबाबत दुष्काळी मतदारांनी जागृत होणे गरजेचं असल्याचे आवाहन दिघे यांनी केले आहे.व निळवंडे व भंडारदरा धरणातून आमच्या वाट्याचे पाणी ताबडतोब सोडावे अशी मागणी कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे यांनी एका प्रसिद्धी पत्रकानंव्ये नुकतीच केल्याने शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
सदर प्रसिद्धी पत्रकावर निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोनीबापू उऱ्हे,रमेश दिघे,सचिव कैलास गव्हाणे,निळवंडे समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे,पाटपाणी समितीचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे,बाबासाहेब गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,बंडू देशमुख,ज्ञानदेव पाटील हारदे,संघटक नानासाहेब गाढवे,कौसर सय्यद,आप्पासाहेब कोल्हे,नवनाथ शिरोळे,रावसाहेब मासाळ,उत्तमराव जोंधळे,अशोक गांडोळे,सचिन मोमले,राजेंद्र निर्मळ,सोमनाथ दंरदले,भिवराज शिंदे,गोरक्षनाथ शिंदेआदींच्या सह्या आहेत.